Menu Close

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्या संघर्षावर झालेल्या चर्चेच्या वेळी भारताने पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. तसेच दोन्ही देशांनी तातडीने तणाव न्यून करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे. भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे. जेरूसलेम पूर्व आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील सद्यस्थिती एकतर्फी पालटण्याचे प्रयत्न होता कामा नयेत. पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये चर्चा चालू करण्यासाठी अनुकूल वातावरण बनवण्यासाठी चालू असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहेे.

इस्रायलला पाठिंबा देणार्‍यांचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी आभार मानतांना भारताचा उल्लेख केला नाही !

इस्रायलला पॅलेस्टाईनविरोधात पाठिंबा देणार्‍या देशांचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्वीट करून आभार मानले आहेत; मात्र यात त्यांनी भारताचा उल्लेख टाळला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *