पणजी – सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणारा कार्यक्रम प्रसारित केल्याविषयी गोव्यातील मुझफ्फर शेख यांनी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘ही वाहिनी नेहमी मुसलमानविरोधी, इस्लामविरोधी कार्यक्रम प्रसारित करते. १५ मे २०२१ या दिवशी या वाहिनीवरून ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘आओ इस्रायलका साथ दे, कलकी लढाई का साथी है इस्रायल’, या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता.
या वेळी मुसलमानांचे श्रद्धास्थान असलेल्या मजिदे नबी या मशिदीचे छायाचित्र दाखवून त्यावर २ क्षेपणास्त्रे सोडून ती मशीद उद्ध्वस्त केली जाते, असे एक ‘ग्राफीक’ दाखवण्यात येत होते. ही वाहिनी मुसलमानांविरुद्ध कार्यक्रम प्रसारित करून देशातील एकात्मतेला बाधा आणत आहे. त्यामुळे या वाहिनीवर शासनाने बंदी घातली पाहिजे.’’ (हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन होते, काही धर्मांध मंदिरांत जाऊन तेथील मूर्तीची तोडफोड करतात, मूर्तीची विटंबना करतात त्या वेळी मुझफ्फर शेख आणि इतर धर्मांध किंवा निधर्मी वाले चकार शब्द उच्चारत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)