Menu Close

शिकागो (अमेरिका) येथे इस्रायलच्या समर्थनार्थ अमेरिकी भारतियांकडून मोर्चे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामध्ये इस्रायलला समर्थन देण्यासाठी अमेरिकेतील शिकागो शहरात अमेरिकी भारतियांनी २ मोर्चे काढले. त्यांनी हमास या जिहादी आतंकवादी संघटनेवर इस्रायलमधील ज्यू नागरिकांवर आक्रमण करण्याचा आरोप केला.

अमेरिकी भारतीय नेते डॉ. भरत बरई यांनी म्हटले की, आम्ही इस्रालयचे आणि त्याच्या नागरिकांचे समर्थन करत आहोत, ज्यांना गाझापट्टीतून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हमासने केवळ इस्रायलमधील लोकांची घरे उद्ध्वस्त केलेली नाहीत, तर गाझामधील लोकांवरही ते दहशत निर्माण करत आहेत. अनेक दशकांपासून युद्धाचा सामना करणार्‍या इस्रायल आणि गाझा यांमधील लोकांना आता शांततेत रहायचे आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *