मुंबई – लसीच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कोरोनावरील लसीचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या जागतिक निविदांना केवळ ४ जणांकडून प्रतिसाद मिळाला आहे; पण या चारही जणांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी या सर्वांना २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ‘प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावीच लागेल’, असे म्हटले आहे.