Menu Close

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे ईदला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना अटक !

  • अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ पाकिस्तानमध्ये हाकलून दिले पाहिजे ! भविष्यात पाकविरुद्ध युद्ध झाल्यास असे धर्मांध कुणाच्या बाजूने असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! घरातील अशा शत्रूंना शोधून त्यांचा बंदोबस्त सरकार आता तरी करणार का ?

  • देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर त्यांना जरब बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच ते पुन्हा पुन्हा असे कृत्य करू धजावतात ! हे स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

  • हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी भाष्य केल्यावर त्यांच्यावर तुटून पडणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, काँग्रेसी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथील जलालाबाद येथे ईदच्या दिवशी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. मौलाना महंमद अफझल, सलमान, साहिद आणि मेराज उपाख्य छोटू अशी त्यांची नावे आहेत.

हे सर्व जण जेव्हा देशविरोधी घोषणा देत होते, तेव्हा कुणीतरी घरातून या घटनेचा व्हिडिओ सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे नोंद केले आहेत.

याविषयी प्रभारी निरीक्षक राजा दिनेश सिंह म्हणाले की, या घटनेच्या प्रकरणी १० अज्ञात लोकांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

‘हिंदु जागरण मंच’ने आवाज उठवला !

वरील घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्यावर ‘हिंदु जागरण मंच’ने याविरुद्ध आवाज उठवला. या संघटनेचे प्रांतमंत्री राजेश कटियार यांनी पोलिसांना आमरण उपोषण करण्याची चेतावणी दिली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांनी समाधानही व्यक्त केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *