Menu Close

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

  • आणखी किती सैनिकांचे प्राण गेल्यावर सरकार या उडत्या शवपेट्यांवर बंदी घालणार आहे ?

  • आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !

वायुदलाचे कोसळलेले मिग-२१ लढाऊ विमान

मोगा (पंजाब) – भारतीय वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरून या विमानाने उड्डाण केले होते. २० मेच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मोगापासून २५ कि.मी. अंतरावरील लंगियाना खुर्द या गावाजवळ हे विमान कोसळले. विमान कोसळत असल्याची चाहूल लागताच वैमानिक चौधरी यांनी विमानातून उडी मारली; परंतु त्या वेळी शीर धडापासून वेगळे होऊन त्यांचा मृत्यू झाला. वातावरण खराब असल्याने बचाव पथक रात्री ११ वाजता घटनास्थळी पोहोचले. हे विमान एका शेतजमिनीत ५ फूट खोल शिरले होते, तर विमानाचे तुकडे १०० फूट परिसरात पसरले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *