Menu Close

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’

इंडियन मेडिकल असोसिएशनची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात ठिकठिकाणी बर्‍याच डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाझार करणे किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावणे यांसारखी अनेक प्रकरणे बाहरे आली. अशा कर्तव्यशून्य आणि भ्रष्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी आय.एम्.ए. मूग गिळून गप्प बसते. योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ज्या तत्परतेने करण्यात आली, तशीच तत्परता आय.एम्.ए. या डॉक्टरांच्या संदर्भात का दाखवत नाही ?

नवी देहली – जनतेसमोर खोटे दावे करणारे आणि भ्रम निर्माण करणारे योगऋषी  रामदेवबाबा यांच्याविरुद्ध साथरोग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने केली आहे. ‘योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, तर असोसिएशनला लोकशाहीचा मार्ग अवलंबून संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी न्यायालयाचेही साहाय्य घेतले जाईल’ अशी चेतावणीही या संघटनेने दिले आहे. ‘स्वतः आरोग्यमंत्र्यांनी अ‍ॅलोपॅथीत पद्युत्तर शिक्षण घेतले आहे. आरोग्यमंत्र्यांनी एक तर योगऋषी रामदेवबाबा यांचे आरोप मान्य करत आधुनिक वैद्यशाखा विसर्जित करावी किंवा धाडस दाखवत रामदेवबाबांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा’, असे आव्हान या संघटनेकडून देण्यात आले आहे.

नुकताच योगऋषी रामदेवबाबा यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात ते ‘अ‍ॅलोपॅथी’ (आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती) औषधोपचार पद्धतीवर टीका करतांना दिसत आहेत. यात ते म्हणत आहेत, ‘हायड्रोक्लोरोक्विन, रेमडेसिविर, अँन्टीबायोटीक, फॅबिप्लून, स्टेरॉईड ही सगळी औषधे कुचकामी ठरली आहेत. प्लाझ्मा थेरेपीवरही बंदी आणली गेली आहे. लाखो लोकांचा मृत्यू अ‍ॅलोपॅथी उपचारांमुळे झाला आहे.’

आरोग्य कर्मचार्‍यांना सन्मान करतो ! – पतंजलि योगपिठाने आरोप फेटाळले

योगऋषी रामदेवबाबा यांच्या हरिद्वार येथील पंतजलि योगपीठ ट्रस्टकडून याविषयी निवेदन जारी करण्यात आले आहे. पतंजलि योगपीठाचे महासचिव आचार्य बाळकृष्ण यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात म्हटले आहे, ‘या महासाथीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत जे दिवस-रात्र काम करत आहेत अशा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा योगऋषी रामदेवबाबा सन्मान करतात. ते कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या अन्य सदस्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरील आलेला संदेश वाचून दाखवत होते.’

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, योगऋषी रामदेवबाबा हे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीने उपचार करणार्‍यांच्या विरोधात कोणत्याही पद्धतीचा चुकीचा विचार नाहीत. त्यांच्या विरोधात केले जाणारे आरोप निरर्थक आणि अयोग्य आहेत.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *