अशांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे ! हिंदु सहिष्णु असल्याने त्यांचा अपलाभ घेण्याच्या होणार्या या प्रयत्नांविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
रतलाम (मध्यप्रदेश) – येथील बाजाला या आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोकांनी या परिचारिकेला पुस्तिका वाटतांना पकडून याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना याची माहिती दिली. संध्या तिवारी असे या परिचारिकेचे नाव आहे. (हिंदूंना बाटवल्यावर त्यांचे मूळ नाव ख्रिस्ती मिशनरी पालटत नाहीत, जेणेकरून हिंदूंना ती व्यक्ती बाटलेली आहे, हे सहज लक्षात येणार नाही, तसेच अशा व्यक्ती ख्रिस्ती धर्मप्रचाराचे कार्य विनाअडथळा चालू ठेवू शकतात ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) पोलीस तिची चौकशी करत आहेत.
Madhya Pradesh: Nurse caught preaching Christianity in tribal dominated area while on door-to-door Covid-19 duty https://t.co/MuRqbMqwpK
— OpIndia.com (@OpIndia_com) May 23, 2021