Menu Close

‘आय.एम्.ए.’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल क्षमा कधी मागणार ? – हिंदु जनजागृती समिती

(म्हणे)‘कोरोनाचा संसर्ग न्यून होण्याचे कारण येशू ख्रिस्त !’ – डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल

अशा प्रकारचे विधान करून डॉ. जयलाल यांनी डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांचा अवमानच केला आहे. ख्रिस्ती, मुसलमान कितीही शिकले, तरी ते धर्मनिरेपक्ष किंवा निधर्मी किंवा पुरो(अधो)गामी होत नाहीत, तर कट्टर धर्मप्रेमी होतात, हे हिंदूंनी यावरून लक्षात घ्यावे !

डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल

मुंबई – योगऋषी रामदेवबाबा यांच्या अ‍ॅलोपॅथीविषयीच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता त्यांनी क्षमा मागितली आहे; मात्र आयुर्वेदावर सातत्याने टीका करणारे, कोरोना काळातही ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवणारे ‘इंडियन मेडीकल असोसिएशन (‘आय.एम्.ए.’चे)’चे विद्यमान अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल हे भारतियांची क्षमा केव्हा मागणार आहेत ? आम्ही ‘अ‍ॅलोपॅथी’च्या विरोधात नाही; तसेच ‘इंडियन मेडीकल असोसिएशन’च्या विरोधात तर नाहीच नाही; मात्र डॉ. जयलाल यांच्या हिंदुविरोधी आणि ख्रिस्ती धर्मांतराला पूरक भूमिका घेण्याच्या विरोधात नक्कीच आहोत. डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होत चालला आहे, याचे श्रेय वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, कोविड योद्धे यांना न देता जीझसला दिले आहे. हा कोरोना संसर्गात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या सर्वांचाच अपमान आहे. या प्रकरणी डॉ. जयलाल यांनी क्षमा मागायलाच हवी अन्यथा स्वतःला ‘ख्रिस्ती धर्मप्रसारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच डॉ. जयलाल यांनी क्षमा न मागितल्यास केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. जयलाल यांना क्षमा मागण्यास भाग पाडावे, असे आवाहनही समितीने केले आहे.

समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

श्री. रमेश शिंदे

१. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर डॉ. जयलाल यांची ‘ख्रिश्‍चॅनिटी टुडे’ला दिलेली मुलाखत ३० मार्च २०२१ या दिवशी प्रकाशित झाली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. यातून ते मेडिकलचे विद्यार्थी, डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्याकडे धर्मांतराची संधी म्हणूनच पहात असल्याचे दिसून येते.

२. जयलाल म्हणतात की, जीझस ख्राइस्टचे प्रेम सर्वांना द्या आणि ‘जीझसच तुमचे रक्षण करील’ असा विश्‍वास सर्वांना द्या ! चर्च आणि ख्रिस्ती दयाभाव यांमुळेच जगातील पूर्वी येऊन गेलेल्या अनेक महामारी आणि रोग यांवर उपाय मिळाले होते. ! त्यांनी आय.एम्.ए.च्या अध्यक्षीय भाषणात तर ‘सर्वशक्तीमान ईश्‍वर ही जीझस ख्राइस्टने दिलेली भेट आहे आणि उद्या जे होईल, ती पण त्याचीच भेट असेल’, असे म्हटले होते. अन्य एका मुलाखतीत ते म्हणाले की, वैश्‍विक महामारी पसरली असूनही ख्रिस्ती धर्म वाढतच चालला आहे. या वक्तव्यांतून ख्रिस्ती धर्मांतराला त्यांचे समर्थन स्पष्ट दिसून येते.

३. याच प्रकारे त्यांनी ‘हग्गाई इंटरनॅशनल’ला देखील मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आयुर्वेदावर आणि केंद्र सरकारवर टीका करतांना डॉ. जयलाल म्हणतात की, मोदी सरकारची सांस्कृतिक मूल्ये आणि पारंपरिक आस्था हिंदुत्वावर आधारित आहेत; म्हणून मोदी सरकार आयुर्वेदावर विश्‍वास ठेवते. आयुर्वेदाचे मूळ संस्कृतमध्ये असून संस्कृत ही हिंदुत्वाची भाषा आहे. अशी वक्तव्ये करून डॉ. जयलाल यांनी त्यांचा हिंदुत्वद्वेष आणि संस्कृतद्वेषच प्रकट केला आहे.

४. अशा धार्मिक द्वेष बाळगणार्‍या व्यक्तीला लोकशाही देशातील इतक्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी रहाण्याचा काहीएक अधिकार नाही. आय.एम्.ए.मधील सर्व डॉक्टरांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक डॉ. जयलाल यांना अध्यक्षपदावरून त्वरित हटवून धर्मांतराचे षड्यंत्र उलथवून लावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *