Menu Close

योगऋषी रामदेवबाबा यांनी विचारलेल्या २५ प्रश्‍नांचे आय.एम्.ए.कडून अद्याप उत्तर नाही !

  • २४ घंट्यांनंतरही आय.एम्.ए.कडून उत्तर नाही !

  • अ‍ॅलोपॅथीकडे उच्च रक्तदाब, काविळ, डोळ्यांचा क्रमांक न्यून करणे, मधुमेह, डोकेदुखी आदींवर कायमस्वरूपी उपचार आहेत का ?

आय.एम्.ए.ने या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असेच जनतेला वाटते !

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीविषयी केलेल्या कथित वक्तव्याविषयी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केल्यानंतर क्षमा मागितली होती; मात्र योगऋषी रामदेवबाब यांनी काही घंट्यांतच अ‍ॅलोपॅथीची औषधे उत्पादन करणारी आस्थापने आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांना २५ प्रश्‍न विचारले आहेत. यांत त्यांनी ‘अ‍ॅलोपॅथीकडे काही आजारांवर ठोस उपाय आहेत का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच ‘अ‍ॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणे योग्य वाटत नाही’, असा टोलाही लगावला आहे. या प्रश्‍नांचे पत्रक योगऋषी रामदेवबाबा यांनी ट्वीट केले आहे.

योगऋषी रामदेवबाबा यांनी विचारलेले २५ प्रश्‍न !

१. अ‍ॅलोपॅथीमध्ये उच्च रक्तदाबावर कायमस्वरूपी औषध आहे का ?

२. टाइप-१ आणि टाइप-२ मधुमेहावर कायमस्वरूपी औषध आहे का ?

३. थॉयरॉइड, आर्थरायटिस, कोलायटिस, अस्थमा यांसारख्या आजारांवर ठोस उपाय आहे का ?

४. फॅटी लिवर सिरॉसिस, हेपेटायटिस यांवर औषध आहे का ?

५. हार्ट ब्लॉकेज् रिव्हर्स करण्यासाठी काय उपाय आहेत ? बायपास, अँजिओप्लास्टी न करता उपचार आहेत का ?

६. इनलार्ज हार्ट आणि ईएफ् न्यून होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहेत का ?

७. डोकेदुखी, मायग्रेन यांवर काही ठोस उपाय आहेत का ?

८. शस्त्रक्रियेविना प्रतिदिन माणसाचे वजन अर्धा किलो न्यून होईल, असे औषध आहे का ?

९. माणसाला लागलेले अमली पदार्थांचे व्यसन सोडण्यासाठी कुठले औषध आहे का ?

१०. अ‍ॅलोपॅथी अस्तित्वात येऊन २०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे जसे तुम्ही क्षयरोग आदींवर कायमस्वरूपी उपाय शोधले आहेत, तसे यकृताच्या आजारावर औषध शोधावे.

११. कॉलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये कॉलेस्ट्रॉल ट्रायग्लिसरायड्स अल्प करण्यासाठी उपचार आहेत का ?

१२. औषध उद्योगांकडे डोळ्यांचा चष्मा आणि चांगल्या प्रकारे ऐकण्यासाठी लावण्यात येणारे यंत्र कायमस्वरूपी हटवण्यासाठी निर्दोष उपचार सांगा ?

१३. हिरड्या भक्कम करणारे औषध सांगावे.

१४. सोरायसिस, सोरायटिक अर्थरायटिस आणि पांढरे डाग यांवर कायमस्वरूपी औषध आहे का ?

१५. आधुनिक वैद्यकीय शास्त्राकडे अँक्लोजिंग स्पाँडिलोसिसचे कायमस्वरूपी औषध आहे का ? आर्ए फॅक्टर पॉझिटिव्हला नेगेटिव्ह करण्याचा उपाय आहे का ?

१६. पार्किसनवर कायमस्वरूपी औषध आहे का ?

१७. दुष्परिणामांविरहित बद्धकोष्ठता, गॅस, पित्त यांवर कायमस्वरूपी औषध आहे का ?

१८. अनिद्रा असणार्‍या लोकांवर अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचा परिणाम ४ ते ६ घंटे इतकाच असतो, त्यातही दुष्परिणाम असतातच. अ‍ॅलोपॅथीकडे याचे समाधान आहे का ?

१९. स्ट्रेस हार्मोंस न्यून करण्यासाठी आणि हॅपी किंवा चांगल्या हार्मोंस वाढवण्यासाठी, ज्यामुळे व्यक्ती तणावमुक्त आणि प्रसन्न राहील, असे औषध अ‍ॅलोपॅथी आस्थापनांनी सांगावीत.

२०. मूल होण्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर होतो, जी जी अत्यंत वेदनादायी आहेत, त्यावर कायमस्वरूपी औषध सांगावे. ज्यामुळे विना टेस्ट ट्यूब बेबी, आयवीएफ्च्या नैसर्गिक पद्धतीने मूल होईल आणि व्यक्ती लाखो रुपयांच्या लुटमारीपासून वाचेल.

२१. औषध उद्योगाने ऐजिंग प्रोसेसला रिव्हर्स करणारी औषधे सांगावीत.

२२. अ‍ॅलोपॅथीमध्ये दुष्परिणाम न होता हिमोग्लोबिन वाढवण्याची निर्दोष पद्धत सांगावी.

२३. व्यक्ती अत्यंत हिंसक, क्रूर आणि अमानवीय कृत्य करत असेल, त्याला मनुष्याप्रमाणे वागण्यास लावणारे एखादे औषध सांगावे.

२४. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यातील वाद कायमस्वरूपी दूर करण्याचे औषध  आस्थापनांनी सांगावे.

२५. कोरोना रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर न लावता त्याच्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचे उपाय अ‍ॅलोपॅथीने सांगावेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *