Menu Close

जयपूरमध्ये हिंदूंच्या मंदिरांवरील भोंग्यांवर प्रशासनाकडून बंदी; मात्र अन्य धर्मियांना सूट !

भाजपच्या आमदाराचा विरोध !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे हिंदु धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न होणारच ! याविषयी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !

जयपूर (राजस्थान) – भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद करण्याविषयी त्यांना जाब विचारला आहे.

येथे अन्य धार्मिक स्थानांना भोंगे लावण्याची मात्र अनुमती देण्यात आली आहे. लाहोटी यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी यात लिहिले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सांगानेर येथील प्रशासन हिंदूंच्या मंदिरांवरील भोंग्यांवरून ऐकवण्यात येणारी आरती आणि पूजा बंद करत आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर मात्र प्रतिबंध आणण्यात आलेला नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *