Menu Close

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

हिंदूंनो, या पोलिसांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करा !

१३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर लाठीमार केला. त्या संदर्भात काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे…

पोलिसांनी हातात बांगड्या भराव्यात ! – कु. कीर्ती बद्दनीमुरी

आम्हा दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर पुरुष पोलिसांनी अत्याचार केले आहेत. पोलिसांनी आम्हाला केस पकडून हाकलले. कोण होती ती मंत्री कि पंतप्रधान ? पोलिसांनी आम्हाला दिलेली वागणूक अशोभनीय असून त्यांनी हातात बांगड्या भराव्यात.

तृप्ती देसाई आणि पोलीस यांना श्री अंबाबाई शिक्षा करेल ! – सौ. शेवंता जाधव

आम्ही गेली ४५ वर्षांपासून प्रत्येक दिवशी देवीच्या दर्शनाला येतो. तृप्ती देसाई यांनी जी मागणी केली, तशी मागणी आजपर्यंत आम्ही स्थानिक महिलांनी कधीही केली नाही. श्री अंबाबाई तृप्ती देसाई आणि पोलीस यांचे वागणे खपवून घेणार नाही. त्यांना देवीच शिक्षा करील.

तृप्ती देसाईने पोलीस संरक्षणाविना येऊन दाखवावे ! – अमृता मुनीश्‍वर 

पुरुष पोलिसांनी आम्हा महिलांवर मंदिरात केलेला लाठीमार, केलेली धक्काबुक्की हे अत्यंत अशोभनीय आहे. तृप्ती देसाईला दर्शनच घ्यायचे आहे, तर मग तिने पोलीस संरक्षणात येण्यापेक्षा एकटीने येऊन दाखवावे, मग आम्ही काय आहोत, ते दाखवतो.

तृप्ती देसाई हिची महिलांविषयीची हीच का कणवता ? – सौ. साक्षी पन्हाळकर

पोलीस तृप्ती देसाई हिला दर्शनासाठी घेऊन जात असतांना दर्शनाच्या रांगेमध्ये उभी असलेली एक महिला चक्कर येऊन पडली. त्या वेळी पुरुष आणि महिला पोलीस, तृप्ती देसाई हे सर्व जण तिला तुडवत दर्शनासाठी गेले.

देसाई हिने मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी स्टंट केला ! – सौ. दीपा पाटील

तृप्ती देसाई हिने येथे येऊन आम्हा कोल्हापूरवासियांमध्ये मतभेद निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हा स्थानिक महिलांवर दर्शन घेण्यासाठी कधीही अन्याय झाला नाही. देसाई हिने मंदिराचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी स्टंट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *