Menu Close

सतर्क गोरक्षकांची कारवाई ; कात्रज चौकात १ सहस्र ८०० किलो गोमांस कह्यात !

Beefपुणे : विजापूरवरून कात्रज-कोंढवा मार्गे मुंबईच्या दिशेने चाललेला एक ट्रक (एम्एच् ०४ एफ्क्यू १३४६) १९ एप्रिल या दिवशी गोरक्षकांनी कात्रज चौकात पकडला. या ट्रकमध्ये १ सहस्र ८०० किलो गोमांस होते. भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती देऊन गोमांस नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आले. दुसर्‍या एका प्रकरणात त्याच दिवशी २१ बछड्यांना हत्येसाठी घेऊन जाणार्‍या टेम्पोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व बछडे जांभुळवाडी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत. येवलेवाडी येथील होय हिंदूच गटाच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने हे गोरक्षण केले. विशेष म्हणजे बछड्यांची वाहतूक करणारा टेम्पो सलग चौथ्यांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला होता. (पहिल्याच वेळी कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली असती, तर वारंवार गुन्हे करण्याची गुन्हेगारांचे धैर्य झाले नसते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या सेवेमध्ये श्री. शिवशंकर स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (गोरक्षण करणार्‍या सर्व गोरक्षकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

गोमांस तस्करी करणार्‍या ट्रकमध्ये मांसाचे रक्त आणि पाणी बाहेर पडू नये, यासाठी विशेष यंत्रणा राबवून रक्त साठण्यासाठी गाडीच्या खाली एक टाकी बसवण्यात आली असल्याचे आढळून आले. (छुप्या पद्धतीने गोहत्या आणि गोतस्करी करता यावी, यासाठी नवनव्या युक्त्या शोधणारे गोहत्यारे ! गोहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेच हे निदर्शक आहे. पोलीस-प्रशासनाने आतातरी गोवंशियांच्या हत्या कायमच्या रोखल्या जाण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *