Menu Close

युवकांनो, आदर्श हिंदु संघटक बनण्यासाठी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील युवा साधकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यशाळेचे आयोजन

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे – कोरोना संसर्गासह नैसर्गिक आपत्ती येण्यासही आता प्रारंभ झालेला आहे. यासमवेतच आपण तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोचलो आहोत. या भीषण आपत्काळात जीवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी झालेल्या युवकांना लहानपणापासूनच साधना समजली आहे, हे कौतुकास्पद आहे. अनेक संत आणि क्रांतीकारक यांनी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण केले आहे, तसेच आपल्याला हिंदूसंघटन करायचे आहे. सध्या शाळा आणि महाविद्यालये कधी चालू होतील ठाऊक नाही. त्यामुळे यापुढे आपला वेळ अधिक व्यय न करता अधिकाधिक साधनेसाठी द्या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे साक्षीदार नव्हे, तर भागीदार व्हा, असे मार्गदर्शक आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि गोवा राज्य येथील युवा साधकांची ‘ऑनलाईन’ कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

‘युवा साधकांमधील संघभाव वाढावा आणि त्यांनी संघटितपणाने हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे, यासाठी या कार्यशाळेला ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते)’, असे नाव देण्यात आले होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले. कार्यशाळेचा उद्देश श्री. कौशल कोठावळे यांनी सांगितला. या कार्यशाळेमध्ये १९० हून अधिक युवा साधक सहभागी झाले होते. या वेळी सहभागी युवा साधकांनी कार्यशाळेतून स्फूर्ती घेऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार केला.

उपलब्ध वेळेचा योग्य वापर करून आपल्या मित्रांना साधनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

अनेक देश त्यांच्या सीमारेषांवर लष्करी कुमक वाढवत आहेत. ही तिसर्‍या महायुद्धाची चाहुल आहे. या युद्धाचे परिणामही भयंकर असणार आहेत. यानंतरच्या काळात युवा वर्गाने दायित्व ओळखून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे. त्यांना मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेचा योग्य वापर करून आपल्या मित्रांना साधनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. मनाच्या भीतीयुक्त स्थितीतून बाहेर पडण्यासाठी विज्ञान शिकवण देऊ शकत नाही. शालेय अभ्यास करतांना चांगले गुण मिळावेत, यासाठी आपण ज्याप्रमाणे झोकून देऊन प्रयत्न करतो, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या कार्यात झोकून देऊन सुवर्णसंधीचा लाभ करून घेऊया. तसेच साधनेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न दैनंदिन करायला हवेत.

सामाजिक माध्यमांद्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा ! – सम्राट देशपांडे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विविध सामाजिक माध्यमांद्वारे कुठेही प्रयत्न केले जात नाहीत; मात्र सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु राष्ट्राचे विचार समाजापर्यंत पोचवता येतात. त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘ट्विटर’ यांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करूया.

विशेष

१. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या ५ युवा साधकांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अन्य युवा साधकांनी साधना आणि समष्टी सेवा यांना अधिक वेळ देण्याचा निश्चय केला.

२. कार्यशाळेतील ३३ युवा साधकांनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण शिकून त्याविषयीची सेवा दायित्व घेऊन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *