Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

उज्जैन (मध्य प्रदेश) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य खूपच चांगले आहे. सध्या देशामध्ये अनेक आध्यात्मिक संस्था, संत, महंत हे लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आत्मनिर्भरता यांसाठी प्रयत्नरत आहेत. या सर्वांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन पाहिले. ते पाहिल्यावर असे दिसून आले की, या दोन्ही संस्था केवळ तसे मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न झाले, असे भावयुक्त प्रतिपादन श्री वृंदावन धाम आश्रमाचे परम चैतन्यजी महाराज यांनी केले. २१ एप्रिल या दिवशी परम चैतन्यजी महाराज यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शन कक्षाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

कर्तव्य आणि शिस्त यांची सांगड असल्यास ध्येय लवकर साध्य होऊ शकते ! – पू. संगमनेरी नागा बाबा

आपण आपल्या कर्तव्याचा विचार करून ते चांगले करायला हवे. आपण जेव्हा ध्येय घेऊन त्या दिशेने वाटचाल करत असतो, तेव्हा एक शिस्त असायला हवी. शिस्त आणि कर्तव्य यांची योग्य सांगड असेल, तर ध्येय लवकर साध्य होऊ शकते; परंतु हे दोन्ही नसेल, तर ध्येयप्राप्ती होणे अवघड आहे, असे प्रतिपादन पू. संगमनेरी नागा बाबा यांनी व्यक्त केले. पू. संगमनेरी नागा बाबा यांनी २२ एप्रिल या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शन कक्षाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *