-
बंगाल म्हणजे गावठी बॉम्बचा कारखानाच बनाला आहे. या बॉम्बचा राजकीय पक्षांकडून सर्रास वापर केला जातो; मात्र एकाही पक्षावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात नाही, हे लक्षात घ्या !
-
बंगालऐवजी असे बॉम्ब एखाद्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडे सापडले असते, तर एकजात काँग्रेस, साम्यवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी, तसेच पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांनी संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली असती, हे लक्षात घ्या !
कोलकाता (बंगाल) – येथील भाजपच्या कार्यालयाजवळ ५१ गावठी बॉम्ब सापडले आहेत. एका पिशवीमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोचले. हे सर्व बॉम्ब अल्प तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याचे अन्वेषण करत आहे. येथील ‘सीसीटीव्ही फुटेज्’ पडताळण्यात येत आहे.
#Kolkata Police recovers 51 crude bombs near BJP office. For more details, watch this #ReporterDiary with India Today's @Prema_Rajaram | #WestBengal #CrudeBombs | More Videos: https://t.co/FAHzdk9TO8 pic.twitter.com/uoR7k983Un
— IndiaToday (@IndiaToday) June 6, 2021
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गावठी बॉम्ब सापडले होते. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास २०० गावठी बॉम्ब जप्त केले होते. त्या आधी येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता, तर ५ कार्यकर्ते घायाळ झाले होते.