हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र कार्य प्रशिक्षण कार्यशाळे’च्या अंतर्गत उत्तर भारतात ३ कार्यशाळांचे आयोजन
देहली – विश्वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते, असे भगवंताचे विधान आहे. आद्य शंकराचार्यांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) ध्येय आपल्या समक्ष ठेवले आहे. एक आदर्श राष्ट्राची संस्थापना व्हावी, हा एकच भाव सर्वांचा आहे. हा भाव समजून घेऊन आपण सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचा निर्धार केला पाहिजे. स्वार्थी आणि अहंकारी राजकीय पक्ष आघाड्या करून भारतावर राज्य करू शकतात, तर समविचारी धर्मप्रेमी एकत्र आले, तर ते हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चित करू शकतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
‘हिंदूंचे परम हित साध्य करण्यासाठी देशाच्या घटनेनुसार हिंदु राष्ट्र व्हावे’, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ साप्ताहिक ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र कार्य प्रशिक्षण कार्यशाळा’ घेण्यात आल्या. या वेळी कार्यशाळेतील समस्त धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला. या कार्यशाळेत देहली, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, पश्चिम उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू या राज्यांतील अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
या कार्यशाळेत ‘सेक्युलरवादामुळे हिंदूंच्या शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा कशा खंडित करण्यात येत आहेत ?, हिंदु राष्ट्राची मागणी घटनात्मक कशी आहे ? आदी अनेक सूत्रांवर मार्गदर्शन करण्यात आले.
क्षणचित्रे१. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, हा विषय सामाजिक माध्यमातून लोकांपर्यंत कसा पोचवू शकतो, याविषयी माहिती देण्यात आली. २. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करतांना साधना कशी करावी’, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. |
धर्मप्रेमी हिंदूंचे अभिप्राय
श्री. वीराराम, राजस्थान – आम्ही हिंदु राष्ट्र बनवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला !
कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर ‘आम्ही सर्व हिंदु आहोेत’, याची जाणीव झाली. यापूर्वी ही जाणीव नव्हती. हिंदु असूनही कपाळावर टिळा लावायचो नाही. ‘ख्रिस्ती राष्ट्र बनवू शकतात, तर आम्हीही एक हिंदु राष्ट्र का बनवू शकणार नाही ? आम्हीही हिंदु राष्ट्र नक्कीच बनवू शकतो, असा आत्मविश्वास या कार्यशाळेतून निर्माण झाला.
नीतू सिंह मलिक, गाझियाबाद, उत्तरप्रदेश – सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे, हे समजले !
मीही सामाजिक माध्यमातून हिंदु धर्मासाठी कार्य करते. या पृथ्वीवर हिंदु धर्माच्या हितासाठी कशा प्रकारे कार्य चालू आहे, हे या ३ कार्यशाळांच्या माध्यमातून समजले. त्यामुळे मीही हिंदु धर्मासाठी कार्य करत आहे, याची जाणीव झाली. आम्हाला सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे, हे या कार्यशाळेमुळे लक्षात आले.
श्री. गर्ग – हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान देण्यास सिद्ध !
हिंदु राष्ट्राच्या कार्यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे. समितीच्या हिंदूसंघटनाच्या कार्यासाठी निवासाची सोय करण्यासाठी मी कधीही सिद्ध आहे.
श्री. जितेंद्र सिंह, भींड, मध्यप्रदेश
अशा प्रकारची ‘ऑनलाईन’ कार्यशाळा भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील हिंदूंसाठी आयोजित केल्यास चांगले होईल.