-
धर्मांधांकडून हिंदूंचा छळ केला जात असल्याचा आरोप !
-
हिंदूंनी स्वतःच्या घराबाहेर लिहिले आहे ‘हे घर विकणे आहे !’
-
हिंदूंच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष !
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – कैरानानंतर आता अलीगडमधील टप्पल पोलीस ठाण्याच्या सीमेतील नूरपूर गावातील हिंदूंनी गावातून पलायन करण्याची चेतावणी दिली आहे. हिंदूंनी स्वतःच्या घराबाहेर ‘हे घर विकणे आहे’, असेही लिहिले आहे. याचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित होताच पोलीस खडबडून जागे झाले त्यांनी लगेच कलुआ, अंसार, सोहिल, मुस्तकीम, सरफू, फारुख, अमजद, लहरू, तौफीक, सहजोर आणि गावातील एक अधिवक्ता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
UP: ‘On sale’ signs put outside homes as Dalits consider fleeing Noorpur citing persecution by hooligans from Muslim community, police denies claims of migrationhttps://t.co/Of1oWflfxl
— OpIndia.com (@OpIndia_com) May 31, 2021
नूरपूर गावातील एक रहिवासी ओमप्रकाश यांनी सांगितले की, २६ मे या दिवशी त्यांच्या २ मुलींचा विवाह होता. वरात आमच्या घरी पोचणारच होती, तेवढ्यात धर्मांधांनी एका प्रार्थनास्थळाजवळ ती रोखली आणि वरातीतील लोक, तसेच गावातील हिंदू यांच्यावर काठ्यांद्वारे आक्रमण केले. यात एका चारचाकी वाहनाची हानी झाली, तसेच त्याच्या चालकासमवेत २ जण घायाळ झाले. यानंतर गावातील हिंदूंनी अप्रसन्नता व्यक्त करत पलायन करण्याची चेतावणी दिली. जेव्हा दुसर्या दिवशी सकाळी मी संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. (हिंदूंसमोर दादागिरी करणारे; मात्र धर्मांधांच्या आक्रमणापुढे शेपूट घालणारे पोलीस ! अशांना नोकरीतून बडतर्फच केले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )
हे अत्यंत सुनियोजित आक्रमण होते ! – गावकरी
गावकर्यांचे म्हणणे आहे की,धर्मांधांनी केलेले हे आक्रमण अत्यंत सुनियोजित होते. यानंतरही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच हिंदूंनी गावातून पलायन करण्याची चेतावणी दिली.
नूरपूर गावात केवळ २० टक्के हिंदू !
नूरपूर गावाची लोकसंख्या ३ सहस्र ५०० इतकी आहे. त्यामध्ये ८० टक्के मुसलमान आणि २० टक्के हिंदू आहेत. गावात ३ मशिदी आणि १ मोठा मदरसा आहे. येतील रहिवासी राजवीर यांनी आरोप केला आहे की, धर्मांधांकडून हिंदूंवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो. हिंदु तरुणींच्या विवाहात अडथळे आणण्याचा हा पहिलाच प्रकार नव्हे, तर यापूर्वी २५ एप्रिल आणि ९ मे या दिवशीही अशा घटना घडल्या आहेत. याप्रकरणी खैर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अनूप प्रधान यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात