Menu Close

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सैन्यातील २ ब्रिगेडिअर्स निवृत्त झाल्यानंतरच्या ४ वर्षांनी त्यांना बढती देऊन मेजर जनरल करण्यात आले आहे. सैन्यात असतांना त्यांची बढती २ वर्षे प्रलंबित होती. नलिन भाटिया आणि व्ही.एन्. चतुर्वेदी अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती; मात्र तेथे त्यांची मागणी फेटाळण्यात आल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांना बढती का देण्यात आली नाही ? याची ‘माहिती अधिकारा’तून माहिती मागवण्यात आल्यावरही उत्तर देण्यात आले नव्हते. (जर असे होणार असेल, तर त्याला माहितीचा अधिकार कसे म्हणायचे ? ही मोगलाईच म्हणावी लागेल ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या सैन्याधिकार्‍यांच्या अधिवक्त्यांनी आरोप केला की, तत्कालीन सैन्यदलप्रमुख या दोघांना पूर्वीच्या सैन्यदलप्रमुखांच्या जवळच्या व्यक्ती समजत होते. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *