Menu Close

सिकंदरा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यात जाणार्‍या जमावाकडून पोलिसांवर आक्रमण

३ पोलीस घायाळ

  • स्वतःचेही रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ? जमावाला पोलीस प्रत्युत्तरही देवू शकत नाहीत का ? त्यांना प्रशिक्षणात हेही शिकवले जात नाही का ?

  • यावरून धर्मांधांवर पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांकडून मार खातात, हे लक्षात घ्या !

आक्रमणात घायाळ झालेले पोलीस

सिकंदरा (उत्तरप्रदेश) – येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्‍या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात सिकंदरा पोलीस चौकीच्या प्रमुखासह एकूण ५ जण घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांतील तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तिघा जणांना अटक केली आहे.

सरायममरेज भागातील काही लोक ६ जून या दिवशी गाजी मियां दर्ग्यात चादर चढवण्यासाठी गेले होते. ही माहिती दर्ग्याजवळ बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांना मिळताच त्यांनी दळणवळण बंदी असल्याचे सांगत या जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला. यातून जमाव आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. जमावाने पोलिसांना थेट मारायला चालू केले. पोलिसांची अतिरिक्त कूमक आल्यावर त्यांनी जमावाला पांगवले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *