Menu Close

भौतिक विकासासह आत्मिक विकास केला, तरच मनुष्य यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – आज चक्रीवादळासारखी नैसर्गिक आपत्ती, तिसर्‍या महायुद्धाकडे सरकणारे जग आणि कोरोनासारखी मानवनिर्मित आपत्ती यांमुळे संपूर्ण जग आपत्काळ अनुभवत आहे. कोरोना विषाणूमुळे लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्यवधी लोक या आजाराशी झुंजत आहेत. त्यामुळे मनुष्याने केलेली प्रगती आणि विज्ञानाची आधुनिकता यांचा अहंकार गळून पडला आहे. मनुष्याची स्वार्थी आणि अहंकारी वृत्ती अन् समष्टी प्रारब्ध हेच आजच्या आपत्काळाचे कारण आहे. त्यामुळे भौतिक विकासासमवेत आत्मिक विकास केला, तरच मनुष्य यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो. आमची महान हिंदु संस्कृती नेहमीच निसर्गाची पूजा आणि इतरांचा विचार करत आली आहे, तसेच प्रत्येक कर्मामध्ये सात्त्विकता पहात आली आहे. त्यामुळे आम्हाला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे सोडून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आपत्कालीन स्थितीत मन सकारात्मक ठेवण्यासाठी ‘ऑनलाईन श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्तरप्रदेश, तसेच बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा आणि आसाम आदी पूर्वेकडील राज्यांतील २ सहस्रांहून अधिक जिज्ञासू अन् धर्मप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सानिका सिंह यांनी केले.

क्षणचित्रे

  • पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘कोरोना महामारीच्या काळात शारीरिक, मानसिक बळासह आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी सनातन संस्थेने सांगितलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ।’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करण्यास सांगितले.
  • या वेळी वैज्ञानिक दृष्टीकोनातून परिणामकारक ठरलेले अग्निहोत्र करण्याचे आवाहनही करण्यात आले.

सृष्टीचे संचालन कोणतेही सरकार किंवा आर्थिक महासत्ता करत नसून परमात्मा करतो ! – पू. नीलेश सिंगबाळ

या सृष्टीचे संचालन कोणतेही सरकार किंवा आर्थिक महासत्ता करत नसून परमात्मा करत असतो. या संचालनाचे शास्त्र आम्ही समजून घेतले नाही, तर वैश्विक संकटे आणि त्यावरील उपाय आम्हाला समजणार नाहीत. आम्ही भाग्यवान आहोत की, आमच्या धर्मग्रंथांमध्ये सृष्टी आणि तिचे संचालन यांविषयी स्थूल अभ्यासासह सूक्ष्म माहितीही दिली आहे.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *