-
‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !
-
कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायद्यासाठी अभियान आरंभण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !
मुंबई – ‘धर्मांतर झाल्यावर राष्ट्रांतर व्हायला वेळ लागत नाही’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहे. इसिसला भारताचे इस्लामिक राष्ट्र करायचे आहे, तर ख्रिस्त्यांना भारत देश ख्रिस्तमय करायचा आहे, बौद्धांना नवीन राष्ट्र हवे आहे, मग धर्मपरिवर्तन कुणाचे होते ? इतिहास आणि सध्याच्या घटना पहाता केवळ हिंदूंचे धर्मांतर होत असल्याचे लक्षात येते. प्रतिवर्षी देशात १५ लाख हिंदूंचे धर्मांतर होते. आज देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. वर्ष १८७६ पासून अखंड भारताची फाळणी होऊन अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली. या सर्व फाळण्यांचे मूळ कारण ‘देशातील धर्मांधांची वाढती लोकसंख्या’, हेच आहे. धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जाते. पोप जॉन पॉल यांनी ‘पूर्ण आशिया ख्रिस्तमय करण्याची माझी इच्छा आहे’, असे विधान केले होते. पूर्वाेत्तर भारत आज पूर्णत: ख्रिस्तमय झाला आहे. हे ख्रिस्ती वेगळ्या राज्याची मागणी करत असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी केले. या कार्यक्रमात श्री. घनवट यांनी कोरोनाच्या काळातही चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र आणि धर्मांतरामुळे आतापर्यंत झालेली हिंदूंची भयावह स्थिती लक्षात आणून दिली. तसेच धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याच्या मागणीचे अभियान चालू करावे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ ९२० जिज्ञासू धर्मप्रेमींनी घेतला.
श्री. सुनील घनवट यांनी मुलाखतीमध्ये मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
धर्माचा प्रचाराच्या नावाखाली हिंदूंची दिशाभूल करून ख्रिस्त्यांकडून धर्मांतर !
इंदिरा गांधी यांच्या काळात भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) झाल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्यांनी सरकारवर दबाव आणून धर्माचा प्रचार करण्याची राज्यघटनेत तरतूद करून घेतली. धर्माचा प्रचार करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनरी गरीब, भोळ्याभाबड्या आणि अशिक्षित हिंदूंची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करतात. रॉबर्ट नेवली या फ्रान्सच्या पाद्र्याने स्वत:चे नाव ‘तत्त्वबोध स्वामी’ असे सांगून ‘हिंदूंच्या चार वेदांच्या पुढे ‘येशू वेद’ हा पाचवा वेद आहे’, असे सांगितले. तसेच ‘ख्रिस्ती क्रिश्न’ ही संकल्पना सांगून हिंदूंची दिशाभूल केली जाते. हे षड्यंत्र असून समाजाने अशा भूलथापांना बळी न पडता हिंदु देवतांवर श्रद्धा ठेवायला हवी.
धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनरी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे धर्मांतरित व्यक्तीकडून लिहून घेतले जाते. अशा प्रकारे कायदेशीर स्तरावरही धर्मांतराला संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
कोरोनाच्या काळातही ख्रिस्त्यांकडून धर्मांतर !
‘कोरोनाच्या काळात ख्रिस्त्यांनी १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले आहे’, असे ‘अनफोल्डिंग वर्ल्ड’चे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) डेव्हिड रीव्स यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये कोविड सेंटर उभारून रुग्णांचे धर्मांतर केले जात आहे. विविध स्वयंसेवी संघटनांना विदेशातून धर्मांतरासाठी पैसा येतो. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांनी ‘येशूला प्रार्थना केल्यामुळे भारतातील कोरोना न्यून झाला’, असे उघडपणे विधान केले. आदिवासीबहुल भागात कोरोनावरील उपचार करतांना धर्मांतराचा प्रयत्न करणार्या परिचारिकांना पकडण्यात आले. कोरोनाच्या काळात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ‘आदिवासी हिंदू नसून त्यांचा धर्म वेगळा आहे. त्यांची नोंद आगामी जनगणनेत वेगळ्या रकान्यात करावी’, अशी मागणी केली.
अवैधपणे धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या संदर्भात पोलिसांची उदासीन भूमिका !
‘धर्माचा प्रचार करणे याचा अर्थ बळजोरीने धर्मांतर करणे, असा नव्हे. असे प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करा’, असे मध्यप्रदेश न्यायालयातील न्यायाधिशांनी सांगितले. त्यामुळे कायद्यात तरतूद असूनही धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. अशा वेळी ‘प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. ‘ड्रग्ज अँड रेमिडिज कायद्या’नुसार रोग बरे करण्याच्या नावाखाली केल्या जाणार्या अवैज्ञानिक दाव्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी; मात्र ‘तुमचा रोग डॉक्टर बरे करू शकत नाहीत, आम्ही येशूला प्रार्थना करतो’, असा उघडपणे दावा करणार्यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नाही. महाराष्ट्रात केवळ हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणला; मात्र हेच अंधश्रद्धावाले अन् नास्तिकतावादी मंडळी पुण्यातील दापोडी, तसेच वसई येथील चर्चमध्ये आजार बरे करण्याच्या नावाखाली जे दावे केले जातात, त्यांवर काहीच बोलत नाहीत. धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.
धर्मांतरित ख्रिस्त्यांना मूळ ख्रिस्त्यांकडून मिळणारी भेदभावाची वागणूक !
धर्मांतर करण्यापूर्वी धर्मांतरित होणार्यांना पैसे दिले जातात; पण नंतर त्यांना अडचणी आल्यानंतर त्यांच्याकडे कुणी लक्षही देत नाही. धर्मांतरितांना दलित ख्रिश्चन, मागासवर्गीय ख्रिश्चन यांसारखी संबोधने देऊन मूळ ख्रिस्ती त्यांना भेदभावाची वागणूक देतात. जेव्हा हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात घेतात, तेव्हा सेक्युलरवादी गळा काढतात. धर्मांतर होतांना हे कुठे असतात ? आज अनेक धर्मांतरितांना स्वधर्मात यायचे आहे.
देशभरात ‘धर्मांतरबंदी कायदा’ त्वरित लागू करा !
आज देशभरात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लवकरात लवकर लागू करायला हवा. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अभियानाला आरंभ करायला हवा. ख्रिस्ती मिशनर्यांना ‘टुरिस्ट (प्रवासी) व्हिसा’ देऊ नये. धर्मांतर करणार्यांकडे पैसे कुठून येतात ? याची चौकशी करायला हवी. सेवेच्या नावाखाली ग्रामीण भागात जाणार्या ख्रिस्त्यांना ग्रामीण भागात जाण्याची अनुमती देऊ नये. तसेच पत्रके वाटणार्या ख्रिस्त्यांना त्यांनी ती पत्रके सरकारला दाखवणे बंधनकारक करावे. रुग्णालयात ‘नन्स’ना नोकरी देऊ नये; कारण तेथे त्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. प्रार्थना आणि आशीर्वाद सभा यांच्या माध्यमातून चालू असलेल्या धर्मांतराच्या विरोधात समाजाने आवाज उठवायला हवा.