-
गेली ४ वर्षे पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? अशा प्रकारच्या आश्रयगृहातून अयोग्य कृती होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊनही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात का येत नाही ?
-
अशा घटनांविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
सिंहभूम (झारखंड) – येथील ‘मदर टेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आश्रयगृहाचे संचालक हरपालसिंह थापर आणि त्यांची पत्नी पुष्पा राणी तिर्की यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुष्पा तिर्की या ‘ईस्ट सिंहभूम डिस्ट्रिक्ट चाईल्ड वेलफेयर कमिटी’च्या अध्यक्ष आहेत. वार्डन गीता सिंह, त्यांचा मुलगा आदित्य सिंह आणि टोनी सिंह नावाचा कर्मचारी यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे सर्व आरोपी पसार आहेत. या आश्रयगृहातून सुटका करण्यात आलेल्या मुली १६-१७ वर्षांच्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. तमिल वणन यांनी सांगितले की, गेल्या ४ वर्षांपासून येथे मुलींचे लैंगिक शोषण केले जात आहे.
Jharkhand: Minor girls sexually abused, tortured at Mother Teresa Welfare Trust, accused are abscondinghttps://t.co/cF242G6iqg
— OpIndia.com (@OpIndia_com) June 10, 2021
१. या मुलींनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्यावर होणार्या लैंगिक शोषणाची माहिती पुष्पा तिर्की यांना दिली होती; मात्र त्यांनी ते रोखण्यासाठी काहीही केले नाही.
२. या आश्रयगृहात एका मुलीचा ब्रेन ट्युमरमुळे मृत्यू झाला होता; मात्र याची माहितीही तिर्की यांनी पोलीस आणि प्रशासन यांना दिली नाही. नियमानुसार ती देणे आवश्यक आहे. ही संस्था झारखंड सरकारकडून मान्यताप्राप्त संस्था आहे. तिचा ‘मदर टेरेसा मिशनरीज ऑफ चॅरिटी’शी संबंध नाही.