Menu Close

बांका (बिहार) येथील स्फोट देशी बॉम्बचाच असल्याचे उघड !

घटनास्थळ

बांका (बिहार) – येथे एका मदरशात झालेला स्फोट हा देशी बॉम्बचा होता. हा बॉम्ब तेथेच एका कंटेनरमध्ये ठेवला होता. तो फुटल्यानंतर मौलाना अब्दुल मोबीन यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. हा मदरसा अनधिकृत होता, असेही उघड झाले आहे.

या प्रकरणाचे अन्वेषण गुप्तचर विभाग, आतंकवादविरोधी पथक आणि विशेष अन्वेषण पथक करत आहेत. याविषयी जिल्हाधिकारी सुहर्ष भगत आणि पोलीस अधीक्षक अरविंद कुमार गुप्ता यांनी १० जून या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनास्थळी आय.ई.डी.चा स्फोट झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. हा स्फोट देशी बॉम्बचाच होता. यासह घटनास्थळी बॉम्बला बांधली जाणारी सुतळी, खिळे आणि कंटेनरचा तुकडा आढळून आला. हा बॉम्ब किती शक्तीशाली होता, हे या संदर्भातील अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. हा मदरसा अनधिकृत होता. तो येथील एका निर्जनस्थळी गेल्या १८-२० वर्षांपासून चालू असून येथे ५० ते ६० मुलांना शिक्षण दिले जात होते. (२० वर्षे अनधिकृत मदरसा चालू रहाण्यास उत्तरदायी असणार्‍या शासकीय अधिकार्‍यांची नावे घोषित करा आणि त्यांना आजन्म कारागृहात टाका ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *