‘लिव्ह इन रिलेशन’ ही पाश्चात्त्यांची विकृती आहे. भारतामध्ये तिचे कुणी अनुकरण करत असेल, तर त्याला गुन्हाच ठरवणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत !
जयपूर (राजस्थान) – विवाहित आणि अविवाहित युगुल एकत्र ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहू शकत नाहीत, असा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला आहे. यात २९ वर्षीय अविवाहित तरुणी आणि ३१ वर्षीय विवाहित तरुण यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून धोका असल्याने सुरक्षा मिळण्यासाठी ही याचिका प्रविष्ट केली होती.
हाईकोर्ट ने प्रेमी युगल को सुरक्षा देने से इनकार करते हुए कहा है कि विवाहित और अविवाहित लिव इन रिलेशन में एक साथ नहीं रह सकते हैं.#Highcourt #Jaipur #Rajasthanhttps://t.co/JSiga0MRFJ
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) June 11, 2021
उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला देत म्हटले की, प्रेमी युगुल यांची केवळ पती आणि पत्नी यांप्रमाणे रहाता येणे, इतकीच नाही, तर विवाह करण्याची त्यांची पात्रताही असायला हवी. अशी पात्रता विवाहित आणि अविवाहित प्रेमींमध्ये असू शकत नाही.