Menu Close

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांमध्ये एकच सज्ञान, तर उर्वरित आरोपी १० ते १२ वर्षांची मुले !

मुलांनी बलात्काराचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला !

  • १० ते १२ वर्षांची मुलेही बलात्कार करू शकत असतील, तर आता सज्ञान असण्याचे वय १८ हून खाली आणले पाहिजे, हेच लक्षात येते !

  • सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पहात ‘पॉस्को’ कायद्यामध्ये पालट करून तो आणखी कठोर केला पाहिजे !

  • मुलांच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून त्याचा वापर अनैतिक गोष्टींसाठी किती केला जात आहे, हे जगजाहीर आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यात अपयश येत असल्याने अशा घटना घडत आहेत, हे लक्षात घेऊन धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

रेवाडी (हरियाणा) – येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या ७ जणांपैकी केवळ १ जण १८ वर्षांचा असून अन्य सर्वजण १० ते १२ वर्षांचे आहेत. या आरोपींनी बलात्कार करतांना त्याचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या शेजारी रहाणार्‍यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी मुलीच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित मुलीच्या शेजार्‍याने व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखले आहे. हा व्हिडिओ प्रसारित करणार्‍याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *