Menu Close

कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !

मंदिरातील मूर्तीही फोडली !

  • बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?

  • तृणमूल काँग्रेसकडून हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होऊ शकत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरील !

(डावीकडे) मंदिरातील भग्न मूर्ती (उजवीकडे) मारहाण झालेले पत्रकार संजीब बसू

कोलकाता (बंगाल) – येथील बालीगंज तिलजला आणि चंदननगर येथे १० जून या दिवशी हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धर्मांधांनी येथील श्री महाकाली मंदिराची तोडफोड केली. याविषयी पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (जर येथे कुणी  अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली असती, तर पोलिसांनी त्याची माहिती लगेचच दिली असती आणि त्यासाठी हिंदूंना उत्तरदायीही ठरवले असते ! हिंदूंपासून सत्यस्थिती लपवून ठेवणारे बंगाल पोलीस हिंदुद्रोहीच होत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) यानंतर पोलिसांनी दोन्ही धर्माच्या लोकांची एकत्रित बैठक बोलावली होती. या हिंसाचाराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात पोलीस हिंसाचार करणार्‍यांवर लाठीमार करत आहेत, तसेच काही जणांना पकडून नेत असल्याचे दिसत आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही या घटनेची नोंद घेतली आहे. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सांगितले आहे.

१. येथे एका अवैध दुकान मालकाचा ग्राहकाशी वाद झाल्यानंतर धर्मांधांनी दगडफेक करण्यास प्रारंभ केला. त्यांनी पोलिसांवरही आक्रमण करून त्यांच्या वाहनांची हानी केली. येथील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते देवदत्त माझी यांनी सांगितले की, धर्मांधांनी येथील श्री महाकाली मंदिराचीही तोडफोड केली. मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली, तसेच भिंतीही पाडण्यात आल्या.

२. माझी यांनी सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित करून सांगितले की, या भागातील हजारीगलीमध्ये हिंदू अडकलेले आहेत. त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

३. या व्हिडिओमध्ये गावठी बॉम्ब फोडण्यात येत असल्याचेही दिसत आहे. या तोडफोडीच्या वेळी संजीब बसू या पत्रकारालाही मारहाण करण्यात आली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *