Menu Close

विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या परिसंवादांतर्गत ‘काय आहे ‘पेटा’चे खरे स्वरूप ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद

श्री. नीरज अत्री

सोलापूर – आज सैन्यबळाविना एखाद्या देशावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आपली उत्पादने खरेदी करण्यासाठी बाध्य केल्याने त्या देशावर सहज नियंत्रण मिळवता येते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने भारतात चालू केलेली ‘वीगन मिल्क’ची (शाकाहारी दुधाची) चर्चा ! काही दिवसांपूर्वी ‘पेटा’ने भारतातील ‘अमूल’ आस्थापनाला पत्र लिहून ‘वीगन दुधा’ची विक्री करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वीगन मिल्क’ बनवले जाते. त्यात जास्त प्रथिने असतात. या ‘सोयामिल्क’चा प्रचार करतांना मात्र या पिकावर मोठ्या प्रमाणात विषारी कीटकनाशकांचा मारा केला जातो, हे लपवले जाते. भारतात गायीच्या दुधाची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर विदेशी आस्थापनांचे आधिपत्य निर्माण करण्यासाठीच अमेरिकेतील ‘पेटा’ संस्थेने ‘अमूल’ आस्थापनाला प्राण्याच्या दुधापेक्षा ‘वीगन मिल्क’ बनवण्याचा सल्ला दिला आहे, असे सडेतोड प्रतिपादन श्री विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केले.

श्री. नीरज अत्री यांनी ‘पेटा’विषयी उघड केलेली सूत्रे

१. ‘पेटा’ या गोंडस नावामागे या आस्थापनाचे भारतीय व्यापार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. ‘पेटा’ हे आस्थापन प्राणी पाळण्याविषयी विरोध करते. ‘पेटा’चा मागील वर्षांचा इतिहास पाहिल्यास वर्ष २००७ मध्ये १ सहस्र ९९७ जिवांना ‘पेटा’ने स्वत:कडे घेतले. त्यातील ३५ जिवांना त्यांनी अन्यांकडे सोपवले, तर १ सहस्र ८१५ जिवांची हत्या करण्यात आली. वर्ष २००९ मध्ये २ सहस्र ३६६ जिवांना या आस्थापनाने रस्त्यावरून उचलले. त्यातील २ सहस्र ३०१ जिवांची हत्या करण्यात आली. इतक्या प्रमाणात प्राण्यांची हत्या होते, तर मग ही प्राण्यांप्रती नैतिकतेची वागणूक आहे का ?

२. रक्षाबंधनाच्या दिवशी या आस्थापनाकडून ट्वीट केले जाते की, आपल्याला गायीला वाचवायचे आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेनिमित्त लेदरचा वापर करू नये. प्रत्यक्षातही रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही लेदरचा किंवा चामड्याचा वापर केला जात नाही. या संघटनेतील उत्तरप्रदेश येथील एका मुलीने ईदच्या काळात आवाहन केले होते की, ‘बकरी ईद’च्या दिवशी पशू हत्या करू नये; मात्र त्या मुलीला तेथून हाकलून देण्यात आले होते. त्यानंतर ‘पेटा’ने तिला कोणतेही सहकार्य केलेले नाही. आता ती मुलगी कुठे आहे, ते कुणालाही ठाऊक नाही. या आस्थापनाला प्राण्यांविषयी खरोखरच कळवळा असता, तर ईदच्या दिवशी लाखो जिवांची हत्या रोखण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केले असते; पण तसे काही झाले नाही.

३. ‘वीगन मिल्क’ बनवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांचा वापर वाढल्याने कर्करोग (कॅन्सर) होण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. कॅन्सरच्या रुग्णालयातही यांचेच लोक आहेत. कर्करोग झाल्याने व्यक्तीला आयुष्यभरात कमवलेल्या रकमेतील निम्म्याहून अधिक रक्कम रुग्णालयाला द्यावी लागते. अशा प्रकारे आधी विषारी कीटकनाशकांद्वारे शरिरात विष निर्माण करून त्यावर उपचार करण्याचे ‘पेटा’चे हे एक व्यापारी तंत्र आहे.

४. या आस्थापनाचा समाजसेवेचा उद्देश नसून त्यांच्या धोरणांमागे व्यावसायिक दृष्टीकोन आहे, हे समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. ‘पेटा’ला पशूंविषयी कळवळा आहे, तर आतापर्यंत त्यांनी एखाद्या जैन मुनींना आपले ‘राजदूत’ (ब्रँड ॲम्बेसिडर) का बनवले नाही ? कारण अहिंसेविषयी जैन मुनीच बोलतात; मात्र ‘आपण पशूहत्या करून त्यांचे मांस भक्षण करू शकतो’, असे शिकवणार्‍या पोपला ‘पेटा’ने आपले ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ केले होते. यातूनच ‘पेटा’चा दुटप्पीपणा दिसून येतो.

केंद्र सरकारने ‘पेटा’वर भारतात बंदी आणायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

अधिवक्ता उमेश शर्मा

१. ‘पेटा’ या संकेतस्थळावर मी त्यांच्या कार्याचा अभ्यास केला, तर वर्ष २०१५ मध्ये तमिळनाडू येथे हत्तींची परेड ‘पेटा’ने थांबवली, वर्ष २०१७ मध्ये धार्मिक कार्यात हत्तींचा वापर करणे थांबवले, नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध, वर्ष २०१८ मध्ये जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला आणि वर्ष २०२० मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी गायीचे पोस्टर लावून ‘मला वाचवा, माझ्या कातडीचा वापर करू नका’, असे लिहिलेले होते. हिंदूंच्या विरोधानंतर ‘पेटा’ने स्पष्टीकरण दिले की, आमच्याकडून चूक झाली. अर्थात ते जाणीवपूर्वक केले होते. ‘पेटा’ने हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या वेळी प्राण्यांवर होणारे आघात रोखण्यासाठी लढा दिल्याची उदाहरणे दिली; मात्र ‘बकरी ईदच्या दिवशी प्राण्याचा बळी दिला जाऊ नये’ म्हणून ते प्रचार करत नाहीत. याउलट ते हलाल मांसाचे समर्थन करतात. ‘अमूल’च्या मागणीनुसार केंद्र सरकारने ‘पेटा’वर भारतात बंदी आणावी.

२. वर्ष २००० मध्ये ‘पेटा’ची स्थापना झाली. त्याच्या संस्थापकाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. खरेतर त्यांचा प्रोफाईल जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. हे आस्थापन विदेशी देशांकडून येणार्‍या देणग्याही स्वीकारते. अशा संघटनांवर भारत सरकारने पाळत ठेवावी. ‘प्रत्येक घरात पशूंची हत्या होते, त्याला विरोध करा’, असा यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसतो.

३. ‘पेटा’च्या ‘एनिमल्स इन इस्लाम डॉट कॉम’ या संकेतस्थळाला भेट दिल्यावर भास होतो की, हे आस्थापन मुसलमानांनाही ‘पशूंवर अत्याचार करू नका’, अशी शिकवण देत आहे; मात्र ‘ईदनिमित्त पशूंची हत्या करू नये’, असा संकेतस्थळावर कुठेही उल्लेख नाही. या आस्थापनाने संकेतस्थळावर ईदविषयी लेख प्रसिद्ध केलेला आहे. त्यात लिहिले आहे, ‘तुम्ही पशूला मारून अल्लाहला धन्यवाद देता की, तू आमचे प्राण वाचवलेस.’ यावरून हे आस्थापन बकरी ईदला प्राण्यांची हत्या करण्याला एकप्रकारे प्रोत्साहितच करत आहे.

४. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थेने ‘वीगन मिल्क’ला दूध म्हणून मान्यता दिलेली नसतांनाही विदेशी आस्थापनांचे हित साधण्यासाठी ‘पेटा’ त्याचा प्रचार करते. त्यामुळे ‘पेटा’च्या प्रत्येक हालचालीवर केंद्र सरकारने लक्ष ठेवावे. त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे.

५. भारतातील युवा वर्गाला प्रोत्साहित करण्याचा ‘पेटा’ला अधिकार नाही. ‘पेटा’ महाविद्यालयीन युवकांना खोटे बोलून भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर नियंत्रण आणायलाच हवे.

‘पेटा’सारख्या विद्वेषी प्रवृत्तीपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी जागृती करणे आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

नरेंद्र सुर्वे

१. सनातन धर्म हा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या उक्तीप्रमाणे विश्व आणि विश्वातील प्रत्येक प्राणीमात्र यांचा विचार करतो. अशा धर्माचे बहुसंख्य लोक या देशात असतांना ‘पेटा’ने हिंदूंना पशूप्रेमाविषयी शिकवणे हेच मुळात हास्यास्पद आहे. विश्वाचा विचार केल्यास सर्वांत अधिक शाकाहारी लोक भारतात रहातात. भारतात मांसाहार करण्याचे प्रमाण पाश्चिमात्यांच्या प्रचारतंत्रामुळे वाढले आहे. हे आस्थापन स्वत: पशूंची हत्या करते. असे हत्यारे भारतातील हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘पेटा’सारख्या हत्या करणार्‍या संघटनेवर भारतात बंदी घालावी. अशा विद्वेषी प्रवृत्तीपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती करायला हवी.

२. भारतातील ‘डेअरी इंडस्ट्री’मधील कारभार ८ लाख कोटी रुपयांचा आहे. त्यातही ‘पेटा’ घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ‘अमूल’ उत्पादनाचा कारभार एका वर्षाला ३८ सहस्र ५०० कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे त्या उत्पादनांनाही लक्ष्य केले जात आहे. ‘अमूल’साठी दूध पुरवठा करणारे अनुमाने १० कोटी शेतकरी आहेत. त्यातील ७० टक्के शेतकरी हे भूमीहीन आहेत. मग त्यांच्यासाठीची पर्यायी व्यवस्था ‘पेटा’कडे आहे का ? ‘डेअरी इंडस्ट्री’ देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपीमध्ये) ४ टक्के योगदान देते. ‘पेटा’ भारतातील मोठ्या बाजारपेठेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते.

३. भारतात ‘वीगन मिल्क’ २९० ते ४०० रुपयांपर्यंत विकले जाते. आपल्याकडे गायीचे दूध ४० ते ५० रुपये लिटरच्या दराने विक्री होते. महागडे ‘वीगन मिल्क’ भारतियांना परवडेल का ?

४. अमेरिकेतून आलेल्या ‘पेटा’ आस्थापनाने सांगावे की, अमेरिकेत प्रतीवर्षी साडेतीन कोटी गायी-म्हशी, १२ कोटी डुकरे, ७० लाख लांडगे, ३ कोटी बदक मारले जातात. प्राणीहिंसा रोखण्यासाठी ‘पेटा’ने आपल्या मायदेशी लक्ष देण्याची अधिक आवश्यकता आहे. अशा संस्थांना भारतात स्थान देणे अयोग्य आहे, तसेच अशा आस्थापनांवर भारतात निर्बंध असायला हवेत.

५. ‘अमूल’च्या उपाध्यक्षांनी म्हटले, ‘पेटा’ विश्वभरात भारताची प्रतिमा मलीन करत आहे.’ आजपर्यंत संपूर्ण देशात गोहत्याविरोधी कायद्याची चर्चा होते, त्यात ‘पेटा’ने कधीही या कायद्याचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन ‘पेटा’ला विरोध करण्याची आवश्यकता आहे.‘

पेटा’ (पिपल्स फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) हे विदेशी आस्थापन आहे. समाजात होणार्‍या पशूंच्या प्रतारणेच्या विरोधात ‘पेटा’ कार्य करते; मात्र काही वर्षांपासून ‘पेटा’ या आस्थापनाची भारतातील कार्यपद्धती आणि त्याची पार्श्वभूमी पाहिल्यास ते काहीतरी विशेष अजेंडा समोर ठेवून कार्य करत आहेत, हे लक्षात येते. त्यामध्ये त्यांचा हिंदुविरोधी भाग सरळ सरळ दिसून येतो. हिंदु सण-उत्सव आणि प्राचीन परंपरा यांच्यात हस्तक्षेप करणे, तसेच भारतातील व्यापारी क्षेत्रातही प्रभाव टाकण्याचा हे आस्थापन प्रयत्न करत आहे. ‘पेटा’ या विदेशी आस्थापनाचे खरे स्वरूप सर्वांसमोर यावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या परिसंवादांतर्गत ‘काय आहे ‘पेटा’चे खरे स्वरूप ?’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. या कार्यक्रमात सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा, हरियाणा येथील श्री विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली येथील प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू ट्यूब आणि ट्विटर या माध्यमांतून ५ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *