Menu Close

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

  • काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण

  • दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !

  • रूबीना यांनी व्यक्त केल्या काश्मिरी हिंदूंच्या वेदना !

  • पाकची तळी उचलणार्‍या अशा नेत्यांना पाकमध्येच हाकलून द्यायला हवे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

  • सातत्याने शत्रूराष्ट्राचा उदोउदो करूनही संबंधित देशद्रोह्यांवर कारवाई न होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! जेथे सरकारी यंत्रणांमध्येच राष्ट्राभिमान नसेल, तेथे तो जनतेत कसा येईल ?

रूबीना शर्मा

भोपाळ – शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या भावजय रूबीना शर्मा यांनी सिंह यांच्या कलम ३७० वर पुनर्विचार करण्याविषयीच्या विधानावर संताप व्यक्त केला. रूबीना यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिंह यांच्यावर टीका केली. रूबीना शर्मा या दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू लक्ष्मण सिंह यांच्या पत्नी आहेत.

दिग्विजय सिंह यांनी नुकत्याच पाकच्या एका पत्रकाराला मुलाखत देतांना ‘काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा पुनर्विचार करू’, असे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपसह देशभरातील विविध राष्ट्रभक्त संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

रुबिना सिंह पुढे म्हणाल्या,

१. लोकशाहीत दिग्विजय सिंह यांना त्यांचे मत मांडायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; पण त्यांच्या विधानामुळे मला दुःख झाले. माझी आईसुद्धा काश्मिरी होती. काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी हिंदूंचे दमन चालू झाले, तेव्हा आमचे देहलीत घर असल्याने आम्ही देहलीला जाऊ शकलो; पण ज्यांचे कुठेही घर नव्हते, त्यांचे प्रचंड हाल झाले. सरकारला ना विस्थापित काश्मिरी हिंदूंची काळजी होती ना त्यांनी काश्मिरी हिंदूंना कुठली हानीभरपाई दिली. त्या भीषण काळानंतर पुन्हा जीवन जगण्यासाठी काश्मिरी हिंदूंना कुणीही साहाय्य केले नाही.

२. ज्या देशाशी आपण लढत आहोत, त्या देशाच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंचा अपमान करण्यात आला. काँग्रसचे अनेक नेते अशी वक्तव्ये करत असतात. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य पहाता काँग्रेसने ‘त्यांच्या पक्षाची अशी कुठली योजना आहे का ?’, हे स्पष्ट केले पाहिजे.

३. जर काश्मीर पाकमध्ये गेले, तर शत्रू पंजाब गिळंकृत करण्यासाठी सरसावेल. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या कुटुंबाने मतांसाठी सीमेपलीकडील लोकांना काश्मीरमध्ये वसवले. काश्मिरींचा उपयोग केवळ निवडणुकांपुरताच करण्यात आला. आम्हाला काहीच मिळाले नाही.

४. दिग्विजय सिंह माझे दीर आहेत. त्यामुळे मी हे सूत्र कौटुंबिक करू इच्छित नाही, तसेच त्यांच्याशी मला भांडणही करायचे नाही. त्यांच्या विधानामुळे काश्मिरी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे मला सांगायचे आहे.

पाकच्या पत्रकाराशी चर्चा करणे काश्मिरी हिंदूंसाठी दुःखदायक !

त्यापूर्वी रूबीना शर्मा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले होते, ‘काश्मिरी हिंदू आणि कथित आरक्षण यांविषयी दुर्दैवी चर्चा चालू आहे. त्यात या गोष्टी शत्रूराष्ट्राच्या एका पत्रकाराला सांगण्यात आल्या. तोही अशा देशाचा पत्रकार ज्या देशाने काश्मिरी हिंदूंना कधीही शांततेत जगू दिले नाही. आम्ही आजपर्यंत फार दुःख सहन केले आहे. अशांशी चर्चा करणे, हेच दुःखदायक आणि अनावश्यक आहे.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *