Menu Close

उत्तरप्रदेश पोलिसांचा ‘ट्विटर’, काँग्रेसचे नेते, पत्रकार आदी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

  • वृद्ध मुसलमान नागरिकाला झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन समाजाला हिंदूंच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न !

  • तावीजचा वाईट परिणाम झाल्याने मुसलमानांकडूनच मारहाण !

हिंदूंना कोणत्याही मार्गाने असहिष्णु दाखवण्याचा अट्टाहास धर्मांध आणि तथाकथित निधर्मीवादी अन् प्रसारमाध्यमे कसा करतात, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट होते ! अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

पीडित अब्दुल समद

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील पोलिसांनी लोणी बॉर्डरवर अब्दुल समद या वृद्ध  मुसलमान व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या आणि बलपूर्वक दाढी कापण्याच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्यावरून ‘ट्विटर’सह ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात पत्रकार महंमद झुबैर आणि राणा आयुब यांनी याविषयी ट्वीट केल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसचे नेते सलमान नाझमी, शमा महंमद, मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, ‘द वायर’ आस्थापन, ट्विटर आय.एन्.सी. आणि ‘ट्विटर’ कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा यांत समावेश आहे.

१. गाझियाबादमध्ये अब्दुल समद याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. या प्रकरणामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती चुकीची असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी म्हटले की, समद याने मारहाण करणार्‍या अज्ञातांच्या विरोधात तक्रार केली होती; मात्र समद त्यांना ओळखत होता. तसेच मारहाण होतांना बलपूर्वक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही.

२. पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार पीडित समद ५ जून या दिवशी राज्यातील बुलंदशहरमधून लोणी बॉर्डर येथे आला होता. तेथून एका अन्य व्यक्तीसमवेत मुख्य आरोपी असणार्‍या परवेश गुज्जर याच्या बंथला येथील घरी गेला होता. परवेशच्या घरी काही वेळात कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहिद ही मुले आली. परवेश आणि या मुलांनी समद याला मारहाण करण्यास चालू केले. पीडित समद तावीज बनवायचे काम करतो. त्याने बनवलेल्या एका तावीजचा परवेशच्या कुटुंबावर वाईट परिणाम झाल्याच्या रागातून त्याला जाब विचारत मारहाण करण्यात आली. अब्दुल समद याने गावातील अनेक लोकांना तावीज दिले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *