Menu Close

इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

नगर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

श्री. हर्षद खानविलकर

नगर – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या हिंदु राजांचा इतिहास केवळ ४ ओळींत शिकवला जातो. ज्या मोगलांनी हिंदूंवर अत्याचार केले, त्यांचे पाठ्यपुस्तकातून उदात्तीकरण केले जाते. विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळाल्यास हिंदूंच्या पराक्रमी राजांनी दिलेले बलीदान पुढच्या पिढीला कसे कळणार ? मोगलांनी हिंदूंवर केलेले अत्याचार पुढच्या पिढीला कसे समजणार ? त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सत्य इतिहास शिकवला जावा, यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. ते महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त येथील धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’मध्ये बोलत होते. या व्याख्यानाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *