कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मायकल फ्रान्सिस सालढाणा यांचा आरोप !
-
एक निवृत्त न्यायाधीश असा दावा करत आहेत, याचा अर्थ तो चुकीचा असण्याची शक्यता नाही ! त्यामुळे देशात गुन्हेगारांना कोण पाठीशी घालतात, हे लक्षात येते !
-
हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांवरून कारवाईसाठी आकाशपाताळ एक करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता पाद्य्रांच्या या कृत्याविषयी का बोलत नाहीत ?
बेंगळुरू (कर्नाटक) – बलात्काराचा आरोपी असणारा माजी बिशप फ्रँको मुलक्कल पैसा आणि राजकीय संबंध यांमुळे कारवाईपासून वाचत होता. त्याच्याकडून झालेल्या बलात्काराचे सूत्र समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली नाही, असा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल फ्रान्सिस सालढाणा यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
सालढाणा म्हणाले की, मुलक्कल याचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनले आहे. एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की, एकट्या केरळमध्ये सुमारे ६० सहस्र ननकडून लैंगिक शोषणावर आवाज उठवण्यात आला आहे. ननकडून आवाज उठवण्यात आल्यानंतरही मुलक्कल याच्यावर कारवाई झाली नाही. ननची केवळ हीच मागणी आहे की, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.