Menu Close

बारामुल्ला येथे आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १२ जणांना अटक

अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ फासावर लटकवावे, अशीच राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १२ जणांना पोलीस आणि सैन्यदल यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्यांच्याकडून हेरॉईनची ११ पाकिटे, ४ पिस्तुले, २० काडतुसे, अनेक मॅग्झीन आणि १ लाख रुपयांचा धनादेश हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे मूल्य २१ लाख ५० सहस्र रुपये इतके आहे. यासह पोलिसांनी १ ट्रक, १ कार आणि १ स्कूटी वाहनही हस्तगत केले आहे. या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *