अन्य सर्च इंजिनद्वारे अद्यापही करता येते डाऊनलोड !
-
गूगलला विरोधानंतरच जाग कशी येते ? अशा प्रकारचे अॅप त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्धच होणार नाहीत, याचा विचार गूगल का करत नाही ?
-
‘गजवा-ए-हिंद’ नावाची संकल्पना अस्तित्वातच नसल्याचे सांगणारे भारतातील मुसलमान धर्मगुरु आणि धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?
नवी देहली – ‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘गजवा-ए-हिंद’ (संपूर्ण भारताला इस्लामी करणे) नावाचा ‘अॅप’ उपलब्ध असल्याचे लोकांना दिसल्यावर त्याच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून विरोध होऊ लागला. या विरोधामुळे गूगलने हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहे; मात्र अन्य सर्च इंजिनवरून ते डाऊनलोड करता येत असल्याचे सांगितले जात आहे. तमिळनाडूतील ‘इंदु मक्कल कत्छी’ (इंदू राजकीय पक्ष) पक्षाकडून ट्वीट करून याची माहिती देण्यात आली होती. ‘अग्नीवीर’ संघटनेचे संस्थापक संजीव नेवार यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांना ‘मेन्शन’ (उद्देशून) करून याविषयीची माहिती ट्वीट केली आहे. त्यांनी या अॅपच्या मागे कोण आहेत ? त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Google removes 'Ghazwa e Hind' app from play store after uproar https://t.co/KiPQpNogko
— OpIndia.com (@OpIndia_com) June 20, 2021