Menu Close

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

राष्ट्रीय स्तरावर #BoycottFacebook तृतीय, तर #Ban_FB_In_India चतुर्थ स्थानी !

मुंबई – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक भारतातून पसार होऊन मलेशियामध्ये लपला आहे. झाकीरकडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत. यांत हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, सनातन प्रभात, सनातन शॉप, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदींच्या पानांचा समावेश आहे. ती चालू करण्याची मागणी करण्यात आल्यानंतरही फेसबूककडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे फेसबूकवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर #BoycottFacebook हा हॅशटॅग ट्रेंड धर्मप्रेमींकडून करण्यात आला होता. काही काळातच यावर ४३ सहस्र लोकांनी ट्वीट करून त्यांचे विचार मांडले. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर होता. याच्याच जोडीला  फेसबूकवर भारतात बंदीची मागणी करणारा #Ban_FB_In_India हाही हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला होता. त्यावर ४२ सहस्र लोकांनी ट्वीट्स केल्या. हा ट्रेंड चतुर्थ स्थानी होता. गेल्या आठवड्यातही अशा प्रकारचा विरोध करण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *