योग केल्यास सर्वांना एकच देव दिसेल ! – योगऋषी रामदेवबाबा यांचे प्रत्युत्तर
-
काँग्रेसवाल्यांना ‘ॐ’ची ‘अॅलर्जी’ आहे आणि अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने त्यांना अधिक प्रिय वाटतात, त्यामुळेच ते प्रत्येक वेळेला अशा प्रकारे वैचारिक प्रदूषण निर्माण करत असतात !
-
योगाची निर्मिती हिंदु धर्मातून झालेली आहे आणि त्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे योग करतांना ‘ॐ’ म्हटल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो; मात्र अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे काँग्रेसचे हिंदु नेते देशात गांधीगिरी चालू झाल्यापासून हिंदु धर्माला अन्य धर्मियांच्या तुलनेत तुच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. हिंदूंनी निवडणुकीद्वारे काँग्रेसला सत्ताच्युत केल्यानंतरही काँग्रेसवाल्यांचे डोळे उघडलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात हिंदू काँग्रेसला इतिहासजमा केल्याविना रहाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
नवी देहली – ‘ॐ’ म्हटल्याने ना योग सामर्थ्यशाली होईल आणि अल्लाचे नाव घेतल्याने ना योगाची शक्ती न्यून होईल’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी केले आहे. त्याला योगऋषी रामदेवबाबा यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान’ म्हणजेच अल्ला, देव सर्व एकच आहेत. त्यामुळे तर ‘ॐ’ म्हणायला काय अडचण आहे ? यामध्ये प्रत्येकाला केवळ एकच देव दिसेल. त्यामुळे योग करायला हवा.
'Neither powerful by Om, nor reduced by Allah': Abhishek Singhvi on Chanting Om during Yoga.https://t.co/JOdxy8mbua
— News18.com (@news18dotcom) June 21, 2021