Menu Close

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलानांवर योगी शासन रा.सु.का. लावणार !

सर्व संपत्ती जप्त करण्याचाही आदेश !

मौलानांवर कठोर कारवाई करण्यासह ज्या १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! अन्यथा धर्मांधांना अटक झाली असली, तरी ते १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करण्यात आणि हिंदूंचे १ सहस्र शत्रू निर्माण करण्यात यशस्वी ठरले, असेच समजले जाईल, हे लक्षात घ्या !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात १ सहस्र हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा मौलानांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा, तसेच त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.  हे दोघेही देहलीतील जामिया नगर भागातील आहेत. या दोघांनी गेल्या दीड वर्षांत नोकरी, विवाह आणि पैसे यांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केल्याचा त्यांचावर आरोप आहे. (या कालावधीत हिंदूंचे धर्मांतर होत असतांना पोलीस, प्रशासन आणि हिंदूंच्या संघटना काय करत होत्या ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१. राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, या धर्मांतराच्या मुळाशी आय.एस्.आय.चे अर्थसाहाय्य आहे. त्या संदर्भात अनेक पुरावेही सापडले आहेत. (देशातील प्रत्येक राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्याच्या मागे पाकिस्तान असल्याचे सातत्याने समोर येऊनही भारत पाकला नष्ट करत नसणे, हे लज्जास्पद आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या धर्मांतराच्या माध्यमातून देशातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्याचे काम करण्यात येत होते. (याचाच अर्थ हा ‘लोकसंख्या जिहाद’ होता, हे स्पष्ट होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. उत्तरप्रदेशाव्यतिरिक्त देहली, हरियाणा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांतही या आरोपींचे जाळे आहे. त्या माध्यमातून त्यांनी १ सहस्र लोकांचे धर्मांतर केले. ही टोळी उत्तरप्रदेशातील नोएडा, वाराणसी, कानपूर, मथुरा, गाझियाबाद आणि इतर जिल्ह्यांत सक्रिय आहे. (या टोळीची पाळेमुळे खणून काढून त्यातील प्रत्येकाला आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. अटक करण्यात आलेले मौलाना उमर गौतम आणि जहांगीर हे दोघेही जामिया नगरमध्ये ‘इस्लामिक दावाह सेंटर’ नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून धर्मांतराचे जाळे चालवत होते. या संस्थेचा उद्देश हिंदूंचे धर्मांतर हाच आहे. यासाठी संस्थेच्या बँक खात्यावर अनेक माध्यमांद्वारे लाखो रुपये आले असून त्याचे पुरावेही आतंकवादविरोधी पथकाला मिळाले आहेत. परदेशातूनही पैसे मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत. (धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची आता चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *