Menu Close

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची (केरळ) – कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शिल्पा मगदूम यांनी संस्थेचा परिचय, कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले, तर सौ. संदीप कौर यांनी नामजपाच्या विविध पद्धती आणि जपमाळा घेऊन नामजप करण्याविषयी विस्तृत माहिती दिली. या प्रवचनाचा लाभ अनेक महिलांनी घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने नियमित घेतल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांची माहितीही देण्यात आली.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आध्यात्मिक समितीच्या डॉ. (सौ.) रूपा माहेश्वरी यांनी केले. तसेच आध्यात्मिक समितीच्या सौ. पूनम खटोड यांनी वक्त्यांचे स्वागत, तर सौ. मंजू खटोड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सौ. स्नेहलता मालपाणी यांनी वक्त्यांचे आभार, तर सौ. नीता चांडक यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

क्षणचित्रे

१. सर्व महिलांनी ‘कार्यक्रम पुष्कळ छान असून सांगितलेली सर्व सूत्रे प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखी आहेत’, असे सांगितले.

२. ‘भविष्यात आम्हाला अशा विविध विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल’, असे मनोगत ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती, केरळ’च्या अध्यक्षा सौ. प्रभा चांडक यांनी व्यक्त केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *