Menu Close

नोकरीचे आमीष दाखवून धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

  • स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्यास नकार !

  • हिंदु जागरण मंचाकडून कारवाईची मागणी

कारवाई करण्यास नकार देणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील हल्दौरामधील स्योहारा गावात रहाणार्‍या महिलेने तिला एका धर्मांध युवकाने नोकरीचे आमीष दाखवून त्याच्या ३ साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप तिने केला आहे. हिंदु जागरण मंच या संघटनेने या घटनेला ‘लव्ह जिहाद’ म्हटले आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे याची तक्रार केली आहे.

१. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जामध्ये या महिलेने म्हटले आहे की, ती मुंबईत घरकाम करत होती. दळणवळण बंदीमुळे काम बंद झाल्याने तेथे केशकर्तनालयात काम करणार्‍या बिजनौर येथील तरुणाने नोकरी देण्याचे आमीष दाखवून बिजनौर येथे आणले. तेथे त्याने त्याच्या साथीदारांसह अनेकवेळा बलात्कार केला.

२. दुसरीकडे स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुखाचा दावा आहे की, ही घटना मुंबईची आहे. तेथून या तरुणाने तिला बिजनौर येथे आणले. त्यामुळे गुन्हा तेथे झाला आहे. (गुन्हा कुठेही घडला, तरी व्यक्ती देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतेे, असा कायदा असतांना पोलीस अशा प्रकारचे उत्तर कसे देतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *