Menu Close

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

  • ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत शोधनिबंधाचे लेखक !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेले हे ७४ वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ५८ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ५ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री. शॉन क्लार्क

मुंबई – व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने तिच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह आध्यात्मिकदृष्ट्या वातावरण प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिक स्पंदने आणि त्यांचा स्वतःच्या जीवनावरील परिणाम याविषयी स्वतः जागृत होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण नित्यनेमाने साधना केल्याने स्वतःकडे सकारात्मकता आकर्षित करतो आणि फलस्वरूप आपोआप अधिकाधिक सात्त्विक पर्याय निवडतो, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते यॉर्क, युनायटेड किंग्डम (यू.के.) येथे आयोजित ‘६ व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ दी इंटरनॅशनल नेटवर्क फॉर दी स्टडीज् ऑफ स्पिरिच्युलिटी’ या वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘इंटरनॅशनल नेटवर्क फॉर दी स्टडीज् ऑफ स्पिरिच्युलिटी (INSS) इन असोसिएट विथ यॉर्क सेंट जॉन युनिव्हर्सिटी, यॉर्क, यू.के.’ यांनी केले होते. श्री. शॉन क्लार्क यांनी ‘हाऊ बिझनेस आणि प्रोफेशनल प्रॅक्टिस अफेक्ट सोसायटी अ‍ॅट अ स्पिरिच्युल लेव्हल’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आणि विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की,

१. समाजाच्या कल्याणासाठी ७० आणि ८० व्या दशकांत उद्योगक्षेत्रात ‘शाश्‍वत विकास’ (Sustainable development) आणि ‘औद्योगिक सामाजिक दायित्व’ (Corporate Social Responsibility (CSR)) या २ महत्त्वपूर्ण चळवळी उभ्या राहिल्या. असे असले, तरी आज समाजाची स्थिती पाहिल्यास सत्तेमधील व्यक्तींचे चारित्र्य, भ्रष्टाचार, हाव, शिक्षणाचा अभाव, प्रयत्नांमधील सातत्याचा अभाव, एकसंघ प्रयत्नांचा अभाव यांसारख्या सूत्रांमुळे या चळवळींची फलनिष्पत्ती अल्प आहे.

२. या चळवळी उभ्या राहून ५० वर्षे उलटली, तरी आज आपल्या सभोवती पाहिल्यास आपल्याला कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणातील अनिष्ट पालट, युद्धाचे सावट यांसारखी आपत्काळ निर्माण करणारी संकटे भेडसावतांना आढळतात. हे सर्व पहाता सर्वांना प्रश्‍न पडणे साहजिक आहे की, मानवजातीचे काही चुकत आहे का ? यामध्ये ‘धर्मपालनाचा अभाव’, हे चुकणारे सूत्र आहे.

३. आद्यशंकराचार्यांनी ‘धर्म’ या संज्ञेची पुढील व्याख्या केली असून तो पुढील तीन कार्ये करतो :

अ. समाजव्यवस्था उत्तम स्थितीत ठेवणे.

आ. प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नती साधणे.

इ. आध्यात्मिक उन्नतीही साध्य करणे.

सद्यःस्थितीत औद्योगिक आचारसंहितेच्या वैचारिक नेतृत्वाचे लक्ष सूत्र क्र. ‘अ.’ आणि ‘आ.’ यांकडे आहे; परंतु कुणाचेही सूत्र क्र. ‘इ.’ (आध्यात्मिक उन्नती) कडे लक्ष नाही. आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांच्या अंतर्गत एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे आपले जीवन आणि आपण जे करतो त्यात सकारात्मकता वाढवणे अन् नकारात्मकता न्यून करणे.

४. त्यानंतर श्री. क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ वापरून करण्यात आलेल्या विपुल संशोधनातील २ प्रयोगांविषयी माहिती दिली.

पहिला प्रयोग पोशाखावर होता. या प्रयोगात एका महिलेने पुढील ७ प्रकारचे पोशाख क्रमाने प्रत्येकी ३० मिनिटे परिधान केले होते – १. ‘व्हाईट इव्हिनिंग गाऊन’ (पायघोळ पांढरा झगा), २. ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ (‘ऑफ शेल्डर’, म्हणजे खांद्यांकडे उघडा असणारा काळ्या रंगाचा पाश्‍चात्त्य पोशाख), ३. काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट, ४. पांढरा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट, ५. सलवार-कुडता, ६. सहावारी साडी आणि ७. नऊवारी साडी.

तिने प्रत्येक पोशाख परिधान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’द्वारे परीक्षण करण्यात आले. त्या महिलेने पहिले ४ पोशाख परिधान केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरचे ३ पोशाख परिधान केल्यानंतर मात्र तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ घट झाली. पोशाख क्र. ३ आणि ४ हे एकसारखेच होते, केवळ रंगात भेद होता, तरीही महिलेने पोशाख क्र. ३ (काळ्या रंगाचा पोशाख) परिधान केला असता पोशाख क्र. ४ च्या तुलनेत तिच्यामध्ये पुष्कळ अधिक नकारात्मक ऊर्जा दिसून आली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महिलेमध्ये सकारात्मक ऊर्जा केवळ तिने शेवटचे ३ पोशाख परिधान केल्यावर दिसून आली.

या प्रयोगातून लक्षात येते की, पोशाखाचा प्रकार आणि रंग याचा व्यक्तीवर आध्यात्मिक (ऊर्जेच्या) स्तरावर परिणाम होतो; मात्र पोशाखांची निर्मिती करणारी आस्थापने आणि संबंधित व्यावसायिक (फॅशन डिझायनर) याविषयी पूर्णतः अनभिज्ञ आहेत. दुसर्‍या प्रयोगात ४ प्रकारच्या संगीताचा व्यक्तीवर झालेला परिणाम यू.ए.एस्. उपकरणाच्या साहाय्याने करण्यात आला.

५. शाश्‍वत विकास आणि व्यावसायिक सामाजिक दायित्व यांच्या पलीकडे ‘आध्यात्मिक परिणाम’ नावाचे एक सूत्र आहे आणि नवीन उत्पादनांची अन् सेवांची निर्मिती करतांना ते विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे, हे या शोधनिबंधाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

६. उद्योग आणि उपभोक्ता या दोन्ही घटकांना याविषयीची जाणीव असणे आवश्यक आहे; कारण सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्यास त्याचा व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतो. परिणामस्वरूप समाजाची हानी, तसेच वातावरणात आध्यात्मिक प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी नित्य साधना करणे हा उपाय आहे.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *