घराबाहेर लावले ‘घर विकणे आहे’ असे फलक !
धर्मांधांकडून हिंदु मुलींची छेडछाड, हिंदूंना धमक्या, मारहाणीच्या घटना ! पोलिसांचे हिंदूंना संरक्षण देण्याचे आश्वासन !
-
गेल्या काही वर्षांत हिंदुबहुल उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल भागांमध्ये हिंदूंना पलायन करण्याची स्थिती धर्मांधांकडून निर्माण केली जात आहे; मात्र यावर ठोस उपाय काढण्यात येत नसल्याने अशा घटना थांबण्याऐवजी प्रतिदिन नवनवीन घटना समोर येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील हिंदूंचे रक्षण करण्यासह धर्मांधांना योग्य संदेश देण्यासाठी कठोर व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
-
उत्तरप्रदेशमध्ये ही स्थिती असेल, तर देशातील ८ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्या राज्यांची हिंदूंची स्थिती काय असेल, याची कल्पना करता येत नाही !
-
हिंदुबहुल भागांत धर्मांधांना घर न मिळाल्यास, त्यावरून हिंदूंना तालिबानी ठरवणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, काँग्रेसी आदी आता धर्मांधांच्या अशा वस्स्त्यांमधील हिंदूंच्या या दयनीय स्थितीविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण झाला होता. यामुळे येथील हिंदू आता येथून पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. येथे केवळ १० हिंदु कुटुंबे रहात आहेत. त्यांच्यावर धर्मांधांकडून धर्मांतरासाठीही दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या घराबाहेर ‘घर विकणे आहे’ असे फलक लावले आहेत. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हिंदूंना समजावून त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले, तर दुसरीकडे धर्मांधांच्या घरांवर कायद्याचे पालन करण्याच्या नोटिसा चिटकवल्या. (छेडछाड करणे, हिंदूंना धमक्या देणे, त्यांना मारहाण करणे यांसारखे गंभीर गुन्हे करणार्या धर्मांधांना अटक न करता पोलीस त्यांच्या घरांवर केवळ नोटिसा चिकटवतात, हे लक्षात घ्या ! यावरून पोलिसांना धर्मांधांना पाठीशी घालायचे आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
Kanpur: Hindu families put “for sale” signs outside their houses after being forced to convert to Islam, SP MLA accused of shielding the goonshttps://t.co/86GErmLNY5
— OpIndia.com (@OpIndia_com) June 24, 2021
कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितले की, सर्व हिंदु कुटुंबांना सुरक्षित रहाण्याचा अधिकार आहे. येथील तणावामुळे तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहोत ! – हिंदूंची वेदना
येथील हिंदु कुटुंबांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे त्रास सहन करत आहोत. त्यामुळे येथून पलायन करण्याचाच मार्ग आम्हाला योग्य वाटतो. येथे मुलींची छेडछाड करणे, मारहाण करणे आदी प्रतिदिनाच्या घटना झाल्या आहेत. आमच्यावर धर्म पालटण्यासाठीही दबाव निर्माण केला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात