- हिंदूंच्या उत्सवांतील चोर्या रोखू न शकणारे पोलीस काय कामाचे ?
- चोरांना मोकळीक देणार्या पोलिसांची शासनाने चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे !
उज्जैन : येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही जणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते (जे काम पोलिसांनी करायला हवे, ते साधूंना करावे लागत असेल, तर पोलीस हवेच कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात); परंतु त्यांची चौकशी न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्यामुळे जुना आखाड्यातील काही साधू आणि भक्त यांनी पोलिसांवर २४ एप्रिल या दिवशी आक्रमण करत मारहाण केली.
एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, सिंहस्थपर्वातील हिंसाचार आणि चोरी, अशा घटनांच्या निषेधार्थ साधूंच्या एका गटाने २४ एप्रिल या दिवशी मोर्चा काढून उज्जैनमधील रस्ते बंद केले होते. (उज्जैनमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नी साधूंना मोर्चा काढावा लागणे, हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात