नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह १३ जण उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा यात समावेश नव्हता. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अधिकार्यांना काही सूचना दिल्या. अयोध्येत विकास करण्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने योजना आखली आहे. अयोध्येत केंद्र आणि राज्य शासन मिळून जवळपास २० सहस्र कोटी रुपयांची कामे करत आहेत.
"Coming Generations Should Desire To Visit Ayodhya At Least Once In Their Lifetime” PM Modi Reviews Development Plan With CM Yogihttps://t.co/H21pOwuYTt
— Swarajya (@SwarajyaMag) June 26, 2021