Menu Close

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ प्रदान !

pratiksha_korgavkar
पुरस्कार स्वीकारतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर (उजवीकडे), तर डावीकडून महापौर अश्विकनी रामाणे, श्री. राजू शेट्टी, श्री. राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर

कोल्हापूर : हिंदु धर्माच्या उत्कृष्ट महिला धर्मप्रसारक म्हणून रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ देऊन २४ एप्रिल या दिवशी गौरवण्यात आले. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात भगिनी मंचाद्वारे आयोजित ‘भगिनी महोत्सव सोहळा – २०१६’ चा सांगता समारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी हा पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत गुणवत्ता प्राप्त केलेल्या भगिनींचाही यानंतर सत्कार करण्यात आला. रोख रक्कम ११ सहस्र रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी अभिनेत्री मधुताई कांबीकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, सामाजिक कार्यकर्त्या शालन शेळके, मनीषा तोकले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ देऊन गौरवण्यात आले.

या वेळी आमदार श्री. राजेश क्षीरसागर, खासदार श्री. राजू शेट्टी, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, दिग्दर्शक यशवंत भालकर, जालंधर पाटील आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर भगिनी मंचच्या संस्थापिका सौ. वैशाली क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आमदार श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, “सौ. वैशाली क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या महिलांना गेली ५ पेक्षाही अधिक वर्षे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात.”

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा हा सन्मान ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

कु. प्रतीक्षा कोरगावकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, “हा सन्मान ज्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी कार्य करते, त्या परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा आहे. आई जगदंबेच्या भूमीत हा पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्य आहे. हिंदु जनजागृती समिती प्रणित महिला रणरागिणी शाखा गेल्या ७ वर्षांपासून कार्यरत आहे. आज अबला झालेल्या स्त्रियांना सबला बनवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना जागृत करत आहे. आज रणरागिणी लव्ह जिहाद सारख्या समस्या, अश्ली लता रोखणे, महिलांना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे यांसारखे अनेक उपक्रम राबवत आहे. सर्व भगिनींनी रणरागिणी बनण्यासाठी प्रयत्न करणे काळाची आवश्यकता आहे.”

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *