मुंबई : झवेरी बाजार बॉम्बस्फोटातील आरोपी झैनुल अबेदिन याला ५ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्) ही कारवाई केली आहे.
झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात होता. मुंबई विमानतळावरून झैनुल याला कह्यात घेण्यात आले आहे.
अबेदिन याने इंडियन मुजाहिदीनला स्फोटके आणि इतर सामान पुरवले. त्याआधारे झवेरी बाजार आणि मुंबईतील इतर ठिकाणांवर १३ जुलै २०११ या दिवशी स्फोट घडवून आणण्यात आले. झैनुल देशाबाहेर पळून जाण्याची सिद्धता करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (अस्तित्वात नसलेल्या हिंदु आतंकवादाविषयी ओरड करणारे आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात