Menu Close

कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्चच्या शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी पोप यांनी क्षमा मागावी !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे पोप फ्रान्सिस यांना आवाहन !

रोमन कॅथॉलिक चर्चने आदिवासी मुलांचा ‘सांस्कृतिक वंशसंहार’ केल्याचा आदिवासी नेत्यांचा आरोप !

  • ‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.

  • ऊठसूठ हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरो(अधो)गामी, तसेच देशी-विदेशी प्रसारमाध्यमे रोमन कॅथॉलिक चर्चची कुकृत्ये,  तसेच ‘सेंट झेवियर’चे हिंदूंवरील अत्याचार यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

  • ख्रिस्त्यांचा उदोउदो करणारे साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतवादी आता ‘ब्र’ही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !

टोरंटो (कॅनडा) – गेल्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्च संचालित शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅनडाच्या भूमीवर येऊन येथील जनतेची क्षमा मागावी, अशी मागणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले.

१. ट्रूडो पुढे म्हणाले की, १९ व्या शतकाच्या आरंभीपासून ते १९७० च्या दशकापर्यंत कॅनडा सरकारने दीड लाख आदिवासी मुलांना चर्च संचालित ‘कॉन्व्हेंट बोर्डिंग शाळां’मध्येच शिक्षण घेण्यासाठी बाध्य केले होते. यामागे ‘त्यांना कॅनडाच्या मुख्य प्रवाहात येता यावे’, हा उद्देश होता. कॅनडाच्या या अधिकृत धोरणामुळे सहस्रावधी मुले स्वतःची संस्कृती आणि भाषा यांपासून दुरावले. यासाठी कॅनडा सरकार व्यथित झाले असून दिलगिरी व्यक्त करते. (भारतात मात्र याच ‘कॉन्व्हेंट’ शाळांत शिकणे प्रतिष्ठितेचे समजले जाते ! या शाळांमध्ये हिंदु मुलींना टिकली लावू न देणे, बांगड्या घालू न देणे, मुलांना स्वतःच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावू न देणे आदी संस्कृतीपासून दूर नेणार्‍या गोष्टी सर्रास होतांना आढळतात ! त्यामुळे भारतातील सरकारनेही अशा ‘कॉन्व्हेंट’ शाळांविषयी आता ठोस भूमिका घ्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

२. आदिवासी नागरिकांच्या नेत्यांनी आरोप केले आहेत की, रोमन कॅथॉलिक शाळांनी या मुलांचा ‘सांस्कृतिक वंशसंहार’ केला. वर्ष १८९९ ते १९९७ या कालावधीत ‘सास्कटचेवान’ प्रांतातील एका शाळेतून ६०० थडगी मिळाली आहेत, तर ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका शाळेतून २१५ थडगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

३. ‘राष्ट्रीय सत्य आणि सलोखा समिती’ने वर्ष २०१५ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार या शाळांमध्ये किमान ३ सहस्र २०० मुलांचा मृत्यू झाला असून त्यातील अर्ध्याहून अधिक मुलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. यांतील अनेक मुले ही बोर्डिंग शाळांतील अत्यंत गलिच्छ वातावरणात रहात असल्याने त्यांना क्षयरोग झाला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

४. अमेरिकेतही लवकरच अमेरिकेतील मूळनिवासी मुलांवर कशाप्रकारे अत्याचार करण्यात आले होते, त्याचे अन्वेषण करण्यात येणार असल्याचे तेथील अंतर्गत प्रकरणांचे सचिव देब  हालांड यांनी घोषित केले आहे.

कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्च संचालित बोर्डिंग शाळांनी केले असे अत्याचार !

रोमन कॅथॉलिक चर्च संचालित बोर्डिंग शाळांमध्ये सहस्रावधी आदिवासी मुलांना शारीरिक आणि लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला. मुले स्थानिक आदिवासी भाषेत बोलत असल्याचे दिसल्यावर त्यांना मारहाण केली जात. सहस्रावधी मुले ही विविध रोग आणि अन्य कारणांमुळे बोर्डिंग शाळांमध्येच मेली. शाळांनी मृतांचे शव त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोचू न देता ते शाळांच्याच आवारात गाडले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *