-
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जनतेला चुकीचा इतिहास शिकवू देणार्या दोषींना सरकारने तात्काळ फासावर लटकवावे, अशीच जनतेची मागणी आहे !
-
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, म्हणजे ७४ वर्षे जनतेला चुकीचा इतिहास शिकू देणारा जगातील एकमेव देश भारत ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नवी देहली – केंद्रशासनाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुकीच्या गोष्टी काढून त्या जागी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती भारतभरातील पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचा चुकीचा संदर्भ शोधण्याचे काम करत आहे. यासंदर्भातच संसदीय समितीने याच्याशी निगडीत सल्ले आणि सूचना मागितल्या आहेत, तसेच याविषयात आवड असणारे शिक्षक, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांना ३० जूनपर्यंत त्यांच्या सूचना मांडण्यासाठी बोलावले होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या प्रभावामुळे काही तज्ञांना त्यांच्या सूचना मांडता आल्या नाहीत. त्यामुळेच सल्ले आणि सूचना देण्याचा अवधी १५ जुलैपर्यंत वाढण्यात आला आहे.
Panel working on 'correcting' history in textbooks, seeks suggestions from stakeholders #news #dailyhunt https://t.co/859ib9ccIW
— Dailyhunt (@DailyhuntApp) July 2, 2021
या समितीचे अध्यक्ष आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, भारतातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वांत आधी देशाला स्थान दिले पाहिजे. वर्ष १९७५ मधील आणीबाणी आणि वर्ष १९९८ मधील पोखरण अणू चाचणीलाही पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले पाहिजे. इतिहासकारांच्या एका विशिष्ट समुहाने चुकीचे संदर्भ दिले होते. अशा प्रकारच्या इतिहासकारांचे वर्चस्व संपुष्टात आले पाहिजे.