Menu Close

आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाला करण्यात येणार्‍या वज्रलेपामुळे तेथे नैसर्गिकरित्या येणारे पाणी बंद झाल्याने संत संतप्त !

धर्मकार्यात धर्माचे ज्ञान नसणार्‍यांकडून ढवळाढवळ करण्याच्या घटना वाढत असून या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य झाली आहे !

खांडवा (मध्यप्रदेश) : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आेंकारेश्‍वर येथील ज्योतिर्लिंगाची होणारी झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची प्रक्रिया चालू आहे. वज्रलेप करण्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी पाणी भरलेले रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे येथील संतांनी संताप व्यक्त केला आहे. हे सूत्र धार्मिक व्यासपिठावर उपस्थित करण्याची सिद्धता चालवली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी केवळ दोनच ठिकाणी अशा प्रकारे पाणी भरलेले रहात होते. एक आेंकारेश्‍वर आणि दुसरे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग होय. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाची नैसर्गिक विशेषता संपुष्टात आली आहे.

१. आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाची झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची ही दुसरी वेळ असून यामुळे पुन्हा वाद उफाळून आला आहे.

२. वर्ष २००४ मध्ये प्रथम जिल्हाधिकारी डी.डी. अग्रवाल यांच्या कार्यकाळात वज्रलेप करतांना वाद निर्माण झाला होता.

३. त्या वेळी संतांनी आंदोलन केले होते. वज्रलेप थांबवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. चारही शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. त्या वेळी आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावणे आणि आवश्यकता झाल्यास स्फटिक कवच लावण्याची सूचना करण्यात आली होती. यासाठी ३० लाख रुपयांचा खर्च येणार होता. त्यामुळे शासनाने सल्ला घेतल्यावर हा विषय गुंडाळून ठेवला होता.

४. सिंहस्थपर्व प्रारंभ झाल्यावर झीज रोखण्यासाठी शासनाने पुन्हा उपाययोजना चालू केली; मात्र या वेळी शासनाने शंकराचार्यांचे मत घेतले नाही कि त्यांना विचारावे असे शासनाला वाटले नाही. स्वतःच्या मनाने ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी वज्रलेप केला. त्यामुळे ज्योतिर्लिंगाची नैसर्गिक विशेषता समाप्त झाली. त्यामुळे मंदिरातील पुजारीही दुःखी आहेत.

स्वतःची कामे नीट न करणारे शासकीय अधिकारी धर्मासंदर्भातील निर्णय कसा काय घेतात ? – महंत मंगलदास महाराज

महंत मंगलदास महाराज आणि अन्य संत संताप व्यक्त करतांना म्हणाले की, शासकीय अधिकारी स्वतःची कामे नीट करू शकत नाहीत, तर त्यांना धर्मांसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला ? वज्रलेप करण्यापूर्वी शंकराचार्यांचे मत घेणे आवश्यक होते. वज्रलेप केल्यामुळे नैसर्गिकरित्या पाणी येणे बंद झाले आहे. या प्रकाराला प्रत्येक स्तरावर विरोध केला जाईल. धर्मासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ शंकराचार्यांचा आहे.

नैसर्गिकरित्या नर्मदेचे पाणी ज्योतिर्लिंगापर्यंत येते !

आेंकार पर्वताला शिवस्वरूप मानले जाते. त्याच्या चारही बाजूला पाणी आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूला पाणी आहे. हे पाणी कुठून येते हे आतापर्यंत कोणालाही ज्ञात नाही. या संदर्भात असे सांगितले जाते की, नर्मदेचे पाणी नैसर्गिकरित्या ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचते.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *