Menu Close

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !

देहलीतच होणार नियुक्ती !

  • या पदासाठी उद्या पुरो(अधो)गामी, साम्यवादी, काँग्रेसी आदींनी अर्ज केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

  • जाणीवपूर्वक भारतद्वेषी लिखाण करणार्‍या अशा विदेशी दैनिकांवर भारतात कायमची बंदी घातली पाहिजे ! केंद्र सरकारने असे धाडस दाखवावे !

  • न्यूयॉर्क टाइम्सने असे विज्ञापन चीन, रशिया, सौदी अरेबिया, फ्रान्स आदी देशांच्या संदर्भात देण्याचे धाडस दाखवले आहे का ?

  • अमेरिकेतील टि्वटर आणि फेसबूक ही सामाजिक माध्यमे अन् आता दैनिक न्यूयॉर्क टाईस या प्रसारमाध्यमांनी एका पाठोपाठ एक भारतविरोधी कारवाया चालवल्या आहेत, हे सरकारने दुर्लक्षून चालणार नाही ! त्यामुळे अशा माध्यमांवर सरकारने बंदी, तर जनतेने बहिष्कार घालणेच देशहिताचे आहे !

नवी देहली –अमेरिकेतील ‘न्यूयार्क टाइम्स’ या दैनिकाने वार्ताहर हवा असल्याचे एक विज्ञापन प्रसिद्ध करतांना त्यात ‘भारतविरोधी आणि मोदीविरोधी’ विचारसरणीची अर्हता ठेवली आहे. १ जुलैला हे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. दक्षिण आशिया उद्योगाच्या संदर्भातील वृत्त संकलन करण्यासाठीच्या पदासाठी हे विज्ञापन असून देहली येथून काम करावे लागणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

या विज्ञापनात लिहिण्यात आलेली सूत्रे

१. भारत सरकारच्या विरोधात लिहिता येणारा आणि सत्तापालट करण्यास साहाय्य करणारा हवा.

२. भारत लोकसंख्येच्या तुलनेत चीनला टक्कर देत आहे आणि जागतिक स्तरावर तो मोठा बनण्याची महत्त्वाकांक्षा बागळून आहे, असे विधान यात करण्यात आले आहे.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चीनला करत असलेला विरोध एक नाटक असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. हे नाटक सीमेवर आणि दोन्ही देशांच्या राजधानींमध्ये चालू आहे.

चीनकडून अमेरिकेतील दैनिकांना दिली जातात कोट्यवधी रुपयांची विज्ञापने !

गेल्या ४ वर्षांमध्ये चीनकडून अमेरिकेतील दैनिकांना भारतीय चलनानुसार १४२ कोटी रुपयांची विज्ञापने देण्यात आली आहेत. यात ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला ४४ कोटी ७३ लाख, ‘वाशिंग्टन पोस्ट’ला ३४ कोटी २९ लाख, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला ३ कोटी ७२ लाख रुपये देण्यात आले आहे. यासह अन्यही अनेक दैनिकांना चीनकडून विज्ञापने दिली जात आहेत. (यामुळेच ही दैनिके चीनला विकली गेली आहेत आणि भारतविरोधी लिखाण करत आहे. यातून अमेरिकेतील दैनिके पीतपत्रकारिता करत आहे, हे लक्षात येते ! अशा दैनिकांवर भारतात बंदी घातली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *