Menu Close

अंनिसविरोधातील मोर्च्याला ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांना पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

पुणे (महाराष्ट्र) : येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोंदूगिरीच्या विरोधात लढत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आव्हान स्वीकारण्यास सिद्ध असूनही अंनिसचे कार्यकर्ते माझ्यासमवेत येत नाहीत, असे प्रतिपादन श्री. छाजेड यांनी केले आहे. (हा आहे अंनिसचा पळपुटेपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या भोंदूगिरीच्या विरोधात श्री. छाजेड यांनी १० एप्रिल या दिवशी पुणे स्थानकापासून विधानभवनापर्यंत सर्वपक्षीय निषेध मोर्च्याचे आयोजन केले होते; पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत मोर्च्याला अनुमती नाकारली, तसेच श्री. छाजेड यांना कलम १४९ अन्वये नोटीसही बजावली. (पोलिसांचा दुटप्पीपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. Kewal Joshi

    यदि पित्रपक्ष में ही मृत्यु हुई हो तो माहालय श्राध्ह कौन सी तिथि को करना चाहिये . कृपया मार्गदर्शन करें …धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *